मुंबई : (Madras High Court On Live-in Relationship) लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांनाही कायदेशीर आणि आर्थिक सुरक्षा मिळण्यासाठी त्यांना 'पत्नी'चा दर्जा देणे ही काळाची गरज आहे, हे महत्त्वपूर्ण निरीक्षण मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या संदर्भातील आरोपीच्या अटकपूर्व जामीनावरील खटल्याची सुनावणी करताना नोंदवले. तसेच याकरिता 'गंधर्व विवाह' ही प्राचीन संकल्पना स्वीकारली पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले.(Madras High Court On Live-in Relationship)
'लिव्ह-इन' भारतीय समाजासाठी एक 'सांस्कृतिक धक्का'
आधुनिकतेच्या नावाखाली सध्या फोफावत चाललेली लिव्ह-इन रिलेशनशिपची संस्कृती भारतीय समाजासाठी एक 'सांस्कृतिक धक्का' आहे, अशी महत्त्वपूर्ण आणि कठोर टिप्पणी न्यायमूर्ती एस. श्रीमाथी यांच्या मदुराई खंडपीठाने केली. तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मनप्पाराय ऑल वुमन पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात संबंधित आरोपीवर ‘लिव्ह-इन’मध्ये राहताना महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे.(Madras High Court On Live-in Relationship)
गंधर्व विवाहाचा उल्लेख करत केली टिप्पणी
न्यायालयाने म्हटले की, सध्याच्या सामाजिक रचनेत, असुरक्षित महिलांचे संरक्षण करणे हे न्यायालयांचे दायित्व आहे, कारण लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांना लग्नानंतर पत्नीला मिळणारे कायदेशीर संरक्षण मिळत नाही. न्यायमूर्ती श्रीमती म्हणाले, "लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलांना गंधर्व विवाहाअंतर्गत पत्नीचा दर्जा दिला पाहिजे, जेणेकरून नात्यात चढ-उतार येत असतानाही त्यांना पत्नीचे हक्क मिळू शकतील." न्यायालयाच्या मते, भारतीय दंड संहितेच्या कलम ६९ ही सध्या अशा प्रकरणांमध्ये महिलांचे संरक्षण करण्यासाठी एक महत्त्वाची कायदेशीर तरतूद आहे.(Madras High Court On Live-in Relationship)