Trump Praises PM Modi : दावोसमध्ये ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं! म्हणाले, "त्यांच्याप्रती मला खूप आदर, ते माझे जवळचे मित्र"

    22-Jan-2026   
Total Views |

Trump

मुंबई : (Donald Trump Praises PM Modi At Davos)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावोस येथे जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 'जवळचा मित्र' आणि 'उत्तम व्यक्ती' अशा शब्दात त्यांनी मोदींची प्रशंसा केली. उभय देशांमध्ये लवकरच व्यापार करार होईल असा विश्वास देखील ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला.(Donald Trump Praises PM Modi At Davos)

पंतप्रधान मोदी यांच्याप्रती मला आदर

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय माध्यमांशी साधलेल्या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले संबंध आणि दोन्ही देशांमधील व्यापार करारावर भाष्य केले. "तुमच्या पंतप्रधानांप्रती मला खूप आदर आहे. ते उत्तम व्यक्ती असून माझे जवळचे मित्र आहेत. लवकरच आम्ही मोठा करार करु, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. मोदींच्या मृदू आणि त्याचवेळी कठोर स्वभावाचा उल्लेख ट्रम्प यांनी केला. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये देखील मोदींच्या स्वभावाच्या दोन्ही पैलूंचा उल्लेख ट्रम्प यांनी केला होता. वैश्विक स्तरावर व्यापारापलीकडे मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक ट्रम्प यांनी केले होते. जागतिक पातळीवर भारताचा आदर केला जाऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय नेते मोदींचे ऐकू लागले आहेत, असेही ट्रम्प म्हणाले.(Donald Trump Praises PM Modi At Davos)

भारत-अमेरिका व्यापार करारावर असलेले काही मतभेद दूर करण्यासाठी वॉशिंग्टन आणि नवी दिल्ली यांच्यात सध्या वाटाघाटी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची ही टिप्पणी महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांमध्ये गेल्या काही काळात तणाव दिसून आला होता, मात्र दावोस मधील ट्रम्प यांचा सूर सौहार्दपूर्ण आणि सकारात्मक होता. संभाव्य व्यापार कराराबाबत थेट प्रश्न विचारला असता, हा करार दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. या घडामोडीमुळे भारत-अमेरिका आर्थिक सहकार्याला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.(Donald Trump Praises PM Modi At Davos)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\