1984 Anti-Sikh Riots: शीखविरोधी दंगल प्रकरणी माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता; तरीही तुरुंगातून सुटका नाहीच

    22-Jan-2026   
Total Views |

Anti-Sikh Riots

मुंबई : (1984 Anti-Sikh Riots)
दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने १९८४ च्या शीखविरोधी दंगलींदरम्यान दिल्लीतील जनकपुरी आणि विकासपुरी भागात झालेल्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणात माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या हिंसाचारात दोन लोकांचा मृत्यू झाला होता. ठोस पुराव्यांच्या अभावी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. (1984 Anti-Sikh Riots)

१९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात शिखविरोधी दंगली उसळल्या होत्या. दिल्लीतील जनकपुरी आणि विकासपुरी भागात झालेल्या हिंसाचारात दोन शिख व्यक्तींची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सज्जन कुमार यांच्यावर जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप होता. मात्र, सुनावणीदरम्यान, आरोपी माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांनी स्वतःचा बचाव करत म्हटले की ते निर्दोष आहेत आणि कधीही हिंसाचारात सहभागी नव्हते आणि त्यांच्या स्वप्नातही ते सहभागी होऊ शकले नसते. (1984 Anti-Sikh Riots)

संपूर्ण प्रकरण काय आहे?

फेब्रुवारी २०१५ मध्ये, विशेष तपास पथकाने सज्जन कुमारविरुद्ध दोन एफआयआर नोंदवले होते. १९८४ च्या दंगली दरम्यान दिल्लीतील जनकपुरी आणि विकासपुरी भागात झालेल्या हिंसाचाराशी संबंधित तक्रारींच्या आधारे हे एफआयआर दाखल करण्यात आले होते. पहिला एफआयआर जनकपुरी हिंसाचाराशी संबंधित होता, जिथे १ नोव्हेंबर १९८४ रोजी सोहन सिंग आणि त्यांचा जावई अवतार सिंग यांची हत्या करण्यात आली होती. दुसरा एफआयआर विकासपुरी घटनेशी संबंधित होता, जिथे २ नोव्हेंबर १९८४ रोजी गुरचरण सिंग यांना जिवंत जाळण्यात आले होते. (1984 Anti-Sikh Riots)

तरीही तुरुंगातून सुटका होणार नाही 

या प्रकरणात सज्जन कुमार निर्दोष सुटले तरी तो सध्या तुरुंगातच राहील. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीशी संबंधित दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सज्जन कुमार यांना आधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेला आव्हान देणारी त्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. (1984 Anti-Sikh Riots)


अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\