मुंबई : (Sunita Willams retires from NASA) अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर अधिकृतपणे निवृत्त झाल्या आहेत. त्यांची निवृत्ती २७ डिसेंबर २०२५ पासून लागू झाल्यासंदर्भात अधिकृत घोषणा नासाने बुधवारी केली. सुनीता विल्यम यांनी आपल्या दीर्घ कारकीर्दीमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर तीन मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करत अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले.(Sunita Willams retires from NASA)
सुनीता विल्यम्स यांच्या यशस्वी कारकीर्दीबाबत नासाने दिलेल्या माहितीनुसार, सुनीता विल्यम्स यांनी एकूण ६०८ दिवस अंतराळात वास्तव्य केले आहे. नासाच्या कुठल्याही अंतराळवीराने अंतराळात वास्तव्य केलेला हा दुसरा सर्वाधिक कालावधी आहे. याशिवाय सुनिता विल्यम्स यांनी एकूण ९ वेळा स्पेसवॉक केला आहे. त्याचा एकूण कालावधी ६२ तास ६ मिनिटे एवढा आहे. कुठल्याही महिला अंतराळवीराने स्पेसवॉकमध्ये केलेला हा सर्वाधिक कालावधी आहे. तर एकूण स्पेसवॉकच्या यादीत सुनीता विल्यम्स चौथ्या क्रमांकावर आहेत.(Sunita Willams retires from NASA)
अलीकडील मोहिमेदरम्यान बोईंगच्या स्टारलाईनर कॅप्सूलमधील तांत्रिक बिघाडामुळे, केवळ एका आठवड्यासाठी नियोजित असलेली मोहीम सुमारे ९ महिन्यांपर्यंत वाढली आणि त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकून राहिल्या. मात्र या कठीण परिस्थितीतही त्यांनी अपार संयम दाखवला. शून्य-गुरुत्वाकर्षणात वनस्पती लागवडीशी संबंधित वैज्ञानिक प्रयोगांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.नासाचे प्रशासक जेरेड आयझेकमेन यांनी सांगितले की, सुनीता विल्यम्स मानवी अंतराळ उड्डाणामध्ये अग्रेसर राहिल्या. तसेच त्यांनी अंतराळ स्थानकामध्ये आपल्या नेतृत्वामधून भविष्यातील मोहिमांची पायाभरणी केली. त्यांच्या योगदानामुळे चंद्रासाठी आर्टेमिस मोहीम आणि भविष्यातील मंगळ ग्रहाच्या मोहिमांसाठी मार्ग सोपा झाला आहे.(Sunita Willams retires from NASA)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\