दावोस : (Davos World Economic Forum) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६ (Davos World Economic Forum) मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सलग दुसऱ्या दिवशीही आपली गुंतवणूक क्षमताच नव्हे, तर जागतिक विश्वासार्हता ठळकपणे अधोरेखित केली. पहिल्या दिवशी विक्रमी यशानंतर, दुसऱ्या दिवशी १२ महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करत सुमारे ₹९.६२ लाख कोटीची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. या गुंतवणुकीतून ९.५ लाखांहून अधिक थेट व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.(Davos World Economic Forum)
जागतिक गुंतवणूकदार, आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्या, नामांकित विद्यापीठे आणि आंतरराष्ट्रीय शहरी संस्थांनी मुंबई महानगरसोबत भागीदारी करण्याची तयारी दर्शविल्याने, मुंबई महानगर प्रदेश हे भारताचे नव्हे तर आशियातील महत्त्वाचे गुंतवणूक केंद्र म्हणून पुढे येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.(Davos World Economic Forum)
जागतिक गुंतवणूकदारांचा एमएमआरवर वाढता विश्वास
दुसऱ्या दिवशी झालेल्या सामंजस्य करारांमध्ये शहरी विकास, पायाभूत सुविधा, औद्योगिक व लॉजिस्टिक्स परिसंस्था, फिनटेक, डेटा सेंटर्स, आरोग्य व वेलनेस, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तसेच हवामान-सक्षम शहरांचा समावेश आहे. हे करार केवळ भांडवली गुंतवणुकीपुरते मर्यादित न राहता, ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम आधारित विकासाचा आराखडा मांडणारे असल्याचे चित्र आहे.(Davos World Economic Forum)
एआय सिटीपासून मेडिसिटीपर्यंत : विकासाचे नवे केंद्र
कॅनडा-स्थित ब्रुकफिल्ड या जागतिक गुंतवणूक संस्थेसोबत झालेल्या कराराला विशेष महत्त्व आहे. या कराराअंतर्गत खारबाव–भिवंडी येथे एआय सिटी, एकात्मिक लॉजिस्टिक्स व औद्योगिक पार्क्स, तसेच वडाळा येथे फिनटेक हब विकसित करण्यात येणार असून, हे सर्व प्रकल्प बीकेसीच्या धर्तीवर नव्या थीम-बेस्ड सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट्स म्हणून आकार घेणार आहेत. (Davos World Economic Forum) त्याचप्रमाणे मिलेनिया रिअल्टर्स आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या समूहासोबत झालेल्या गुंतवणुकीतून पुढील पिढीचे बिझनेस डिस्ट्रिक्ट्स, मिश्र-वापराच्या शहरी वसाहती आणि अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. आरोग्य क्षेत्रात, ज्युपिटर वेलनेससोबत झालेल्या करारातून जागतिक दर्जाचे ‘मेडी सिटी’ साकारण्यात येणार असून, त्यामध्ये उपचार, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि संबंधित सेवा एकाच परिसंस्थेत उपलब्ध होणार आहेत.(Davos World Economic Forum)
दोन दिवसांत १८.४२ लाख कोटींची गुंतवणूक
दावोस २०२६ (Davos World Economic Forum) च्या केवळ दोन दिवसांत एमएमआरडीएने एकूण ₹१८.४२ लाख कोटी इतक्या परकीय गुंतवणुकीच्या प्रतिबद्धता मिळवत १९ लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत. (Davos World Economic Forum) ही कामगिरी मुंबई महानगर प्रदेशाच्या नियोजनक्षमतेचा, धोरणात्मक दृष्टिकोनाचा आणि जागतिक विश्वासार्हतेचा ठोस पुरावा मानली जात आहे.(Davos World Economic Forum)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.