Vidhan Parishad : लोकप्रतिनिधींची उत्तरदायित्वाची भावना हाच सशक्त लोकशाहीचा पाया

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे ; ८६ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद

    20-Jan-2026   
Total Views |
Vidhan Parishad
 
लखनौ : (Vidhan Parishad) लोकप्रतिनिधींची उत्तरदायित्वाची भावना हाच सशक्त लोकशाहीचा पाया आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे (Vidhan Parishad) सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. लखनौ येथे आयोजित ८६ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत (Vidhan Parishad) ते बोलत होते.
 
'जनतेप्रति विधिमंडळांचे उत्तरदायित्व' या विषयावर बोलताना सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, "लोकप्रतिनिधींचे जनतेप्रती उत्तरदायित्व ही केवळ नैतिक अपेक्षा नसून सशक्त आणि गतिमान लोकशाहीसाठीची एक अनिवार्य कार्यात्मक गरज आहे. लोकप्रतिनिधी आणि लोकशाही संस्थांची अधिमान्यता केवळ निवडणुकीद्वारे मिळत नाही, तर सातत्यपूर्ण पारदर्शकता, नैतिक आचरण आणि जनतेच्या आकांक्षांप्रती संवेदनशीलतेतून ती दृढ होत जाते."(Vidhan Parishad)
 
महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा संदर्भ देताना प्रा. राम शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्य’ संकल्पनेचा उल्लेख केला, ज्यात प्रजेचे कल्याण हे राज्यकारभाराच्या केंद्रस्थानी होते. तसेच महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक विचारांचा संदर्भ देत, लोकप्रतिनिधी हे केवळ निवडून आलेले पदाधिकारी नसून, जनतेच्या आकांक्षांचे विश्वस्त असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.(Vidhan Parishad)
 
हेही वाचा : Belasis Flyover : १३० वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल अवघ्या १५ महिन्यांत नव्या रूपात 
 
उत्तरदायित्व ही निवडणूकीपुरती औपचारिक प्रक्रिया नाही
 
“उत्तरदायित्व ही निवडणुकीपुरती, पाच वर्षांतून एकदा येणारी औपचारिक प्रक्रिया नाही. ती प्रत्येक तासाची, प्रत्येक क्षणाची सततची जबाबदारी आहे. विधिमंडळांतील बेशिस्त आणि गोंधळ यामुळे जनतेचा विश्वास डळमळीत होतो. कायद्यांच्या निर्मितीत नागरिकांचा सहभाग वाढल्याशिवाय खरी उत्तरदायित्वाची सुरुवात होत नाही.(Vidhan Parishad) तंत्रज्ञानामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधील नाते आमूलाग्र बदलले. सभागृहातील कामकाज, प्रश्नोत्तरे, उपस्थिती आणि चर्चा, कार्यवृत्ताचे संदर्भ वेळेत उपलब्ध करून दिल्यामुळे पारदर्शकता अधिक बळकट झाली. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विश्लेषणाच्या माध्यमातून तक्रार निवारणावर लक्ष ठेवले जात असून, सभागृहात दिलेली आश्वासने प्रत्यक्षात तळागाळापर्यंत पोहोचत आहेत की नाही, याची खातरजमा केली जात आहे," असेही त्यांनी सांगितले.(Vidhan Parishad)
 
विधिमंडळ हे अभ्यासपूर्ण चर्चेचे व्यासपीठ असावे
 
नैतिक आचरण आणि संसदीय शिस्त याशिवाय उत्तरदायित्व अपूर्ण आहे.(Vidhan Parishad) वारंवार होणाऱ्या तहकूब आणि गोंधळामुळे जनतेचा विश्वास कमी होतो. विधिमंडळ हे अभ्यासपूर्ण चर्चेचे व्यासपीठ असावे, बेशिस्त, गडबड-गोंधळाचे नव्हे. लोकशाही ही रोजच्या उत्तरदायित्वाच्या कृतींवर टिकून असलेली जिवंत व्यवस्था आहे. लखनौ येथे आपण सर्वांनी संकल्प करूया की, भारतीय विधिमंडळे पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सर्वोत्तम लोकशाहीचे जागतिक मानदंड ठरतील,” असेही प्रा. राम शिंदे म्हणाले.(Vidhan Parishad)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....