Mahamagham Festival : 'महामघ महोत्सवा'ची रथयात्रा स्टॅलिन सरकारने अडवली; राज्यातील प्रवेश नाकारला

    20-Jan-2026   
Total Views |
Mahamagham Festival
 
मुंबई : (Mahamagham Festival) तमिळनाडूतील स्टॅलिन सरकारने सोमवारी केरळमधील कुंभ मेळा–महामघ महोत्सवाशी (Mahamagham Festival) संबंधित ‘रथयात्रा’ आपल्या राज्यातून काढण्यास परवानगी देण्यास नकार दिला. ही रथयात्रा उदुमलपेटजवळील थिरुमूर्ती टेकड्यांपासून सुरू होणार होती. हे ठिकाण भरतपुझा नदीचे उगमस्थान आहे. अशी माहिती आहे की, आयोजकांनी सांगितले की उदुमलपेट पोलिसांनी यात्रेला मध्येच रोखले आणि चेन्नईतील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी यासाठी परवानगी नाकारल्याचे कळवले. त्यानंतर रथयात्रेतील ‘महामेरू’ मूर्ती गाडीतून केरळ सीमेपर्यंत नेण्यात आली. तेथून ही यात्रा आता पलक्कड मार्गे पुढे जाणार आहे.(Mahamagham Festival)
 
ही रथयात्रा केरळमधील थिरुनावाया येथे भरतपुझा नदीच्या काठी होणाऱ्या महामघ महोत्सवामचा (Mahamagham Festival) एक महत्त्वाचा भाग आहे. आयोजकांच्या मते, तमिळनाडू आणि केरळ यांच्यातील प्राचीन सांस्कृतिक व आध्यात्मिक नाते अधिक दृढ करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार होती. या यात्रेत तमिळनाडूमधील (Mahamagham Festival) अनेक मोठ्या आश्रमांचे व धार्मिक संस्थांचे प्रमुख सहभागी होणार होते. ही यात्रा २१ जानेवारी २०२६ रोजी थिरुनावाया येथे संपणार असून तेथे कुंभ मेळ्याचे मुख्य धार्मिक विधी पार पडणार आहेत.(Mahamagham Festival)
 
हेही वाचा : बहराइचमध्ये बुलडोझर कारवाई; मेडिकल कॉलेज परिसरातील अतिक्रमित मजार उद्ध्वस्त 
 
तमिळनाडूमध्ये स्टालिन सरकारने रथयात्रेबाबत अडथळे आणले असले, तरी केरळमध्ये महामघ महोत्सव २०२६ (Mahamagham Festival) ची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे. सोमवारी केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी ध्वजारोहण करून महोत्सवाचे उद्घाटन केले. याआधी पहाटे नवमुकुंद मंदिराच्या घाटावर महामंडलेश्वर स्वामी आनंदवनम भारती महाराज यांच्या नेतृत्वाखाली भाविकांनी पहिली पवित्र स्नान केली. यावेळी परिसरात वैदिक मंत्रोच्चार आणि भजनांचा गजर घुमत होता. रथयात्रेचे नेतृत्व करणारे आचार्य डॉ. श्रीनाथ कार्याट यांनी सांगितले की, तमिळनाडू प्रशासनाने सहकार्य केले नसले तरी धार्मिक विधी आणि यात्रा केरळमध्ये ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण केली जाईल.(Mahamagham Festival)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक