कल्याण : (Municipal Elections) केडीएमसी मध्ये भाजपा-शिवसेना युतीचे तब्बल २० नगरसेवक पदांचे उमेदवार मतदान आणि निकालापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या यशस्वी व्यूहरचनेमुळे विरोधी पक्षाच्या अनेक दिग्गज उमेदवारांनी माघार घेतल्याने महायुतीच्या पराडे निवडणूकी पूर्वीच जड झाले आहे. दोन्ही पक्षांकडून विजयाचा गुलाल जरी उधळला असेल तरी निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या इतिहासात अशा प्रकारची कामगिरी पहिल्यांदाच झाली आहे. (Municipal Elections)
केडीएमसी निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी युतीच्या ९ उमेदवारांचा विजय झाला होता. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही गोटात आनंदाचे वातावरण होते. शुक्रवारी दि. २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. या दिवशी महायुतीच्या ११ उमेदवारांनी बिनविरोध विजयी होण्याचा बहुमान मिळविला. यामध्ये भाजपाचे पराडे जड असून १४ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध विजयी होत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास भाजपाच्या मुकुंद पेडणेकर यांनी विजयाचे खाते खोलले. त्या पाठोपाठ महेश पाटील विजयी झाले. एका मागोमाग एक करत भाजपा आणि शिवसेनेच्या ११ उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. त्यामुळे युतीचे एकूण २० नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. केडीएमसीच्या निवडणूक इतिहासात आतापर्यंत इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार कधी ही निवडणून आले नव्हते. (Municipal Elections)
महायुतीच्या या बिनविरोध उमेदवारांमध्ये डोंबिवली पूर्व, पश्चिम आणि कल्याण पूर्वेच्या पॅनलचा समावेश आहे. मात्र कल्याण पश्चिमेमधून कोणत्याही पॅनल मधून बिनविरोध उमेदवार निवडून आले नाहीत. निवडणूकीपूवीच मिळालेल्या या यशाने महायुतीचे मनोबल वाढले आहे. आणि आता भाजपाच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी आम्ही ताकद लावणार असल्याचे भाजपाचे विजयी उमेदवार दिपेश म्हात्रे यांनी सांगितले. (Municipal Elections)
महायुतीसमोर विरोधकांची माघार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले. त्यांच्याकडून महायुतीवर सडकून टीका ही करण्यात आली. पण निवडणूकीच्या रिंगणात उबाठा आणि मनसेसारख्या प्रमुख पक्षातील उमेदवारांनी कचखाऊ धोरण स्विकारत माघार घेतली. (Municipal Elections)
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेतील - भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध निवडून आलेले विजयी उमेदवार
▪️पॅनेल नंबर १८
सौ. रेखा चौधरी – प्र क्र. १८ (अ)
▪️पॅनेल नंबर २३
दिपेश म्हात्रे – प्र क्र. २३ (अ)
हर्षदाताई भोईर – प्र क्र. २३ (क)
जयेश म्हात्रे – प्र क्र. २३ (ड)
▪️पॅनेल नंबर २४
ज्योती पाटील – प्र क्र. २४ (ब)
▪️पॅनेल नंबर २६
मुकंद (विशू) पेडणेकर – प्र क्र. २६ (अ)
रंजना मितेश पेणकर – प्र क्र. २६ (ब)
. आसावरी नवरे – प्र क्र. २६ (क)
▪️पॅनेल नंबर २७
मंदा पाटील – प्र क्र. २७ (अ)
महेश पाटील – प्र क्र. २७ (ड)
▪️पॅनेल नंबर १९
पूजा म्हात्रे – प्र क्र. १९ (अ)
साई शेलार – प्र क्र. १९ (क)
डॉ. सुनिता पाटील – प्र क्र. १९ (ब)
▪️पॅनेल नंबर ३०
रविना माळी – प्र क्र. ३० (अ)
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बिनविरोध नगरसेवक पदाच्या विजयी उमेदवार