पुणे : (MPSC) पोलिस उपनिरीक्षक पदाच्या भरतीची जाहिरात उशीरा प्रसिद्ध झाल्याचे सांगत या पदाची वयोमर्यादा एका वर्षाने वाढवण्याची मागणी राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी करत आहेत. पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. (MPSC)
एमपीएससीची (MPSC) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रात्री १.१३ वाजता रस्त्यावर बसून आंदोलन केलं. पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने व वयोमर्यादा वाढीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं. विद्यार्थी आंदोलकांना मध्यरात्री रस्त्यावरुन पोलिसांनी हटवले. आचारसंहिता लागू असल्याने आंदोलनाची परवानगी विद्यार्थ्यांना नव्हती. तरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते. (MPSC)
शास्त्री रोडवर बसून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. परीक्षेसाठी वयोमर्यादा एका वर्षाने वाढवण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. यासंदर्भात वेळोवेळी निवेदन देऊनही सरकार दखल घेत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. पुण्यातील शास्त्री रोडवरती स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. विद्यार्थी आंदोलकांना मध्यरात्री रस्त्यावरुन पोलिसांनी हटवले. आचारसंहिता लागू असल्याने आंदोलनाची परवानगी विद्यार्थ्यांना नव्हती. (MPSC)
शास्त्री रस्त्याच्या परिसरात एमपीएससीची (MPSC) तयारी करणारे अनेक विद्यार्थी राहतात. चहा, नाश्त्याच्या कट्ट्यावर या आंदोलनाचे नियोजन झाले होते. रात्रीची वेळ ठरली आणि विद्यार्थी जमले. स्थानिकांनी पोलिसांना आदोलनाची माहिती कळवली. रात्री पासून सकाळ पर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.