पुणे: (Amar Awale) निवडणुकीमध्ये प्रस्थापित पक्षाकडून तिकीट मिळणे आणि निवडणूकीत जिंकून येणे हे समिकरण गोरगरीब सामान्य जनता करू शकत नाही, असे गृहितक असतानाच पुण्यामध्ये सफाई कर्मचारी दाम्पत्यांचा मुलगा बनला भाजपतर्फे नगरसेवक झाला आहे. भाजपचे प्रभाग क्र. २७ नवी पेठ- पर्वतीचे नवनिर्वाचित नगरसेवक अमर आवळे (Amar Awale) असे या नगरसेवकाचे नाव आहे.(Amar Awale)
हेही वाचा : Sanjay Kelkar : इंडियन रबर कंपनीच्या कामगारांना २८ वर्षांनी मिळणार दिलासा :आमदार संजय केळकर
अमर (Amar Awale) यांचे वडील महापालिकेच्या ड्रेनेज विभागात बिगारी म्हणून तर आई सफाई कामगार आहेत. आंबिल ओढा झोपडपट्टीत लहानपण गेलेले अमर आता महापालिकेच्या साने गुरुजी वसाहतीमधील क्वार्टरमध्ये राहतात. ते (Amar Awale) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वंयसेवक आहेत. गेले २५ वर्ष ते भाजपचे कार्यकर्ता म्हणून काम करत होते. पुणे भाजपचे अध्यक्ष धिरज घाटे यांनी अमर आवळे (Amar Awale) यांना पक्षातर्फे उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केला होता. पक्षाने संधी दिल्यावर अमर यांनी या संधीचे सोने करीत विजय मिळविला.(Amar Awale)