मुंबई : (Rashtra Sevika Samiti) समाजात मातृशक्तीची म्हणजेच स्त्रीची भूमिका खूप महत्वाची असते, स्त्री ही कुटुंब घडवणारी असते कुटुंबाला दिशा देणारी असते. पुढच्या पिढीवर संस्कार करण्याचे महत्वाचे दायित्व मातृशक्तीवर असते, त्यामुळे संस्कार करणारी स्त्री आधी स्वतः अनुशासनपूर्ण हवी. असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या (Rashtra Sevika Samiti) कोकण प्रांत सहबौद्धिक प्रमुख सौ. राधा भिडे यांनी केले.(Rashtra Sevika Samiti)
समरस- सुखमय- सुसंघटित असा समाज घडण्यासाठी 'राष्ट्र सर्वोपरि' हे बीज प्रत्येक कुटूंबात रुजणे आवश्यक आहे. त्यासाठीच राष्ट्र सेविका समिति (Rashtra Sevika Samiti) हे अखिल हिंदू महिलांचे संघटन, स्त्री ही राष्ट्राची आधारशक्ती हे सूत्र अनुसरून सक्षम मातृशक्तीचे संघटन करण्याचे काम गेली नऊ दशके अविरतपणे करत आहे. त्याचेच दृष्य स्वरुप म्हणजे 'संचलन'!(Rashtra Sevika Samiti)
राष्ट्र सेविका समितिचे (Rashtra Sevika Samiti) मकर संक्रमण उत्सव व सघोष पथसंचलन रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी नवी मुंबईतील वाशी येथे शिस्तबद्धरित्या संपन्न झाले. IES नवी मुंबई प्रायमरी स्कूल इथून संचलनाची सुरवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक- जैन मंदिर- वाशी गुरुद्वारा- झुलेलाल मंदिर असे मार्गक्रमण करत हे संचलन पुन्हा IES नवी मुंबई प्रायमरी स्कूल या मुख्य स्थानी परतले. या संचलनासाठी कोकण प्रांत सहबौद्धिक प्रमुख राधा भिडे व जिल्हा कार्यवाहिका विद्या नाडकर्णी यांची विशेष उपस्थिती होती.(Rashtra Sevika Samiti)
पंचपरिवर्तनावर बोलताना राधाताई भिडे पुढे म्हणाल्या की, देश आता वेगाने प्रगती करत आहे, परंतु काही विशेष गोष्टींमध्ये आपल्याला बदल करावे लागतील. यामध्ये आपली भूमिका असलेले महत्वाचे परिवर्तन म्हणजे कुटुंब परिवर्तन आहे. प्रत्येक घरात बदल झाला तरच समाजात बदल होऊ शकतो.(Rashtra Sevika Samiti) देशाचे नागरिक म्हणून वाहतुकीचे सर्व नियम पाळणे हे आपले कर्तव्य आहे. आपण स्वदेशी वस्तूंचा वापर करून देशाच्या विकासाला हातभार लावायला हवा.(Rashtra Sevika Samiti)
दायित्वबोध आणि गणवेशाचे महत्व सांगताना राधाताईंनी सांगितले की, आपला जो गणवेश आहे त्याचे अपार महत्व आहे. त्याचबरोबर आपल्याला मिळालेले दायित्व समर्थपणे निभावणे हे आपले कर्तव्य आहे. दायित्व म्हणजे जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण नित्यकार्य करून पार पाडली पाहिजे.(Rashtra Sevika Samiti)
एकूण २२० सेविका संचलनात सहभागी होत्या. स्थानिक सेविकांच्या परिश्रमासह जवळपास ४० संघबंधूंनी या कार्याची पूर्तता करण्यास हातभार लावला. संपूर्ण वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाचे समापन झाले.(Rashtra Sevika Samiti)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.