मुंबई : (Tata Mumbai Marathon) रविवार दि. १८ जानेवारी रोजी टाटा मुंबई मॅरेथॉन (Tata Mumbai Marathon) या जागतिक ख्यातिप्राप्त स्पर्धेचे एकविसावे संस्करण पार पडले. संस्कृतभारतीच्या कार्याचे समर्थन करीत या स्पर्धेत एकूण २१ धावकांनी भाग घेतला. यात संस्कृतभारतीचे दोन कार्यकर्ते कृष्ण धुरी आणि नेहा हजारे यात समाविष्ट होते. बदलापूर - गोरेगाव या दूरस्थ उपनगरांपासून ते गिरगावपर्यंत आलेल्या ३० कार्यकर्त्यांनी पहाटे ४:४५ पासून सकाळी ९:३० पर्यंत चॅरिटी कॉरिडोर या हुतात्मा चौकाजवळील स्थळी उत्साहाने संस्कृत आणि आरोग्य संबंधित घोषणा संस्कतमधून दिल्या. या घोषणांना धावकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वंदेमातरमच्या सार्धशती निमित्त 'वंदेमातरम' हा विषय थीम म्हणून प्रचारात स्वीकारला. कुतुहलाने विचारणाऱ्या नागरिकांना बोली संस्कृतची सहजता आणि संस्कृतभारतीच्या कार्याची माहिती दिली. याचबरोबर प्रचारपत्रकांचे वितरणही केले. आपली संस्कृती जपत, थांबणाऱ्या धावकांचे पारंपारिक पद्धतीने औक्षण करून अभिनंदन केले. संस्कृतभारतीचे कार्यकर्ते वेशभुषेत विशेष करून महिला नववारी साड्या आणि पुरूष धोतर / पायजमा - कुडता असे परिधान करून आले होते.(Tata Mumbai Marathon)
संस्कृतभारतीचे कोकण प्रांतमंत्री नीरज दांडेकर, प्रांतसंभाषणशिबिरप्रमुखा ख्याती देशपांडे हे कार्यकर्त्यांचे उत्साहवर्धन करण्यास उपस्थित होते. मुंबादेवी जिल्हामंत्रिणी विद्या आडिवरेकर या मुंबईतील कार्यकर्त्यांसह सक्रियपणे सिध्दतेपासून प्रचारकार्यापर्यंत पुर्णपणे कार्यरत होते. या विश्वविख्यात मॅरेथॉनच्या (Tata Mumbai Marathon) माध्यमातून धनसंग्रहण, सेवा, प्रचार, आरोग्य या सगळ्या कार्याची संधी वैयक्तिक आणि संस्था स्तरावर प्राप्त होते. विविध क्षेत्रांत समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्थांसह संस्कृतभारतीचा यंदा तिसरा अनुभव होता. कार्यकर्त्यांचा उत्साह, नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे हे कार्य वर्षागणिक वाढेल असा विश्वास आहे.(Tata Mumbai Marathon)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.