Kurla Attack Protest : कुर्ल्यात प्राणघातक हल्ल्यानंतर उसळले जनआक्रोश;कार्यालयावर हिंदू समाजाचा धडक मोर्चा, प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईचे आदेश
19-Jan-2026
Total Views |
मुंबई : (Kurla Attack Protest) कुर्ला परिसरात दि. १८ रोजी काही मुस्लिम टोळी व अनधिकृत फेरीवाल्यांनी मिळून आकाश सिंग, माजी युवा मोर्चा उत्तर मध्य मुंबई जिल्हा महामंत्री आदित्य पानसे आणि उत्तर मध्य मुंबईचे माजी सोशल मीडिया प्रमुख भाजप असीम सिंग यांच्यावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याने (Kurla Attack Protest) शहरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात आकाश सिंग यांच्या डोक्यावर थेट पेव्हर ब्लॉकने वार करण्यात आला असून धारदार शस्त्रांनीही हल्ला झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. आदित्य पानसे व असीम सिंग यांनाही गंभीर दुखापत होऊन टाके घालावे लागले आहेत.(Kurla Attack Protest)
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सकल हिंदू समाज कुर्लाच्या वतीने लक्ष्मणराव यादव मंडई येथून एल विभाग कार्यालयापर्यंत जोरदार धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कुर्ला परिसरातील वाढती गुन्हेगारी, अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमण आणि टोळक्यांची दहशत याविरोधात संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.(Kurla Attack Protest)
विशेष म्हणजे, या सर्व विषयांबाबत यापूर्वीही सकल हिंदू समाजाच्या वतीने मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र सातत्याने शून्य कारवाई होत राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून त्याचाच उद्रेक म्हणून आज एल वॉर्ड कार्यालयावर हा उठाव करण्यात आल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले.(Kurla Attack Protest)
मोर्चादरम्यान एल वॉर्डचे सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर आणि परिमंडळ पाचचे सहाय्यक आयुक्त सावंत यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाची तात्काळ दखल घेत सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांनी लेखी आदेश काढत न्यू मिल रोड, कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन परिसर ते सहारा जंक्शनपर्यंत अनधिकृत फेरीवाले, फुटपाथवरील बेकायदेशीर स्टॉल्स तसेच दुकानांमुळे रस्त्यावर झालेली अतिक्रमणे हटवण्यासाठी महानगरपालिका व पोलीस यंत्रणेमार्फत नियमित कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.(Kurla Attack Protest)
तसेच परिसरातील नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सक्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.(Kurla Attack Protest) यासोबतच दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेतला जाईल, असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले.(Kurla Attack Protest)
दरम्यान, पोलिस प्रशासनाच्या वतीने येत्या चोवीस तासांत हल्ल्यात सहभागी असलेल्या मुस्लिम टोळी व अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. कुर्ला (Kurla Attack Protest) परिसरातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर आता प्रशासनाची पुढील भूमिका निर्णायक ठरणार आहे.(Kurla Attack Protest)
कुर्ला फेरीवाला-मुक्त व अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी ही वैयक्तिक नाही, तर परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. वारंवार तक्रारी करूनही कारवाई झाली नाही. (Kurla Attack Protest) आता ठोस निर्णय आणि कठोर अंमलबजावणी झालीच पाहिजे. रस्ते-फुटपाथ मोकळे झाले पाहिजेत, दोषींवर कारवाई झाली पाहिजे; अन्यथा २६ जानेवारीपासून एल वॉर्डमध्ये आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला जाईल.(Kurla Attack Protest)
वेंकट बोद्दुल, सकल हिंदू समाज कार्यकर्ते
कुर्ला परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर फेरीवाल्यांची आणि रिक्षावालयांची दादागिरी आणि धमकावण्याच्या घटनांवर तात्काळ व कठोर कारवाई झाली नाही, तर संतप्त जनभावना अधिक तीव्र स्वरूप धारण करेल. प्रशासनाने या गोष्टींवर जाणीवपूर्वक वारंवार दुर्लक्ष केल्यास परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात विचित्र स्थिती निर्माण होईल.(Kurla Attack Protest)