दावोस : (CM Devendra Fadnavis) स्वित्झर्लंडमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे मराठमोळ्या पद्धतीने अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष स्वागत समारंभात स्वदेशापासून दूर असलेल्या मराठी बांधवांचा आपुलकीचा ओघ पाहायला मिळाला. पारंपरिक मराठी संस्कृती, भाषेचा गोडवा आणि महाराष्ट्राशी असलेली नाळ यांचा सुंदर संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला.(CM Devendra Fadnavis)
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी उपस्थित मराठी समुदायाला संबोधित करताना एक महत्त्वाची घोषणा केली. जगभर विखुरलेल्या मराठी बांधवाना एकत्र बांधण्यासाठी ‘महा-एनआरआय कनेक्ट’ हा विशेष प्लॅटफॉर्म उभारण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी जाहीर केले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, आज जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहे. उद्योग, तंत्रज्ञान, संशोधन, शिक्षण, कला, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात मराठी व्यक्ती आपली छाप पाडत आहेत. या सर्वांच्या कार्याची माहिती एकमेकांपर्यंत पोहोचणे, अनुभवांची देवाणघेवाण होणे आणि एकमेकांना प्रेरणा मिळणे अत्यंत गरजेचे आहे.(CM Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले की, ‘महा-एनआरआय कनेक्ट’ हा प्लॅटफॉर्म केवळ संवादापुरता मर्यादित न राहता, अर्थपूर्ण, परिवर्तनशील आणि दीर्घकालीन सहकार्याचे माध्यम ठरेल. जगाच्या पाठीवर कुठेही मराठी माणूस असला, तरी त्याचा महाराष्ट्राशी आणि इतर मराठी बांधवांशी असलेला भावनिक व वैचारिक कनेक्ट कायम राहिला पाहिजे, हीच या उपक्रमामागची भूमिका आहे.(CM Devendra Fadnavis)
आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा संदर्भ देत सांगितले की, स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या मूल्यांवरच मराठी अस्मिता उभी आहे. नव्या काळातील तंत्रज्ञानाचा वापर करून, जागतिक स्तरावर असलेल्या मराठी समाजाला या तीन मूलभूत तत्त्वांशी जोडण्याचे कार्य ‘महा-एनआरआय कनेक्ट’च्या माध्यमातून केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(CM Devendra Fadnavis)
हा प्लॅटफॉर्म मराठी समाजाला नव्या उंचीवर नेण्याचा, जागतिक स्तरावर मराठी ओळख अधिक भक्कम करण्याचा आणि महाराष्ट्राच्या विकासात परदेशातील मराठी बांधवांचा सक्रिय सहभाग वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नमूद केले. त्यांच्या या घोषणेला उपस्थित मराठी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, स्वित्झर्लंडमधील या स्नेहसंमेलनाने जागतिक मराठी एकतेचा संदेश अधिक ठळकपणे दिला आहे.(CM Devendra Fadnavis)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.