Tribal Atrocities Case : आदिवासी कामगारावर अमानुष अत्याचार प्रकरणी उबाठा कार्यकर्त्यांविरोधात ॲट्रोसिटी अंतर्गत अटकेची मागणी
19-Jan-2026
Total Views |
मुंबई : (Tribal Atrocities Case) मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानदिनी गिरगावातील वॉर्ड क्रमांक २१८ येथे भगवे कपडे घातलेल्या एका तरुणास उबाठा कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. आदिवासी कामगार केशव पावरा याच्यावर झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणाने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे.(Tribal Atrocities Case) उबाठा कार्यकर्त्यावर केशव पावरा याला ‘बोगस मतदार’ ठरवत बेदम मारहाण केल्याचा आरोप असून, पीडिताने राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे सविस्तर लेखी जबाब नोंदवला आहे. संबंधित सर्व आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार (Tribal Atrocities Case) प्रतिबंधक कायद्यान्वये कठोर गुन्हे दाखल करून तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.(Tribal Atrocities Case)
आयोगाकडे दाखल तक्रारीत निलेश अहिरेकर, कुलदीप बापर्डेकर, जगदीश तेलंग, सुरेश शेट्ये, संतोष शिंदे, रवींद्र शिंदे, समीर मांजरेकर, अभिषेक बापर्डेकर, विजय नाईक, राजेश खोत, विशाल सागवेकर, प्रशांत शेलार, अनिकेत हळदणकर, यश काटे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.(Tribal Atrocities Case)
केशव पावरा हे मतदानासाठी आले नसताना, कोणतीही शहानिशा न करता त्यांच्यावर संशयाच्या आधारे हल्ला करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.(Tribal Atrocities Case)
या घटनेदरम्यान जातीवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वर्तन आणि जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचा आरोप असून, ही घटना आदिवासी समाजाच्या (Tribal Atrocities Case) सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी असल्याचे चित्र समोर आले आहे. या प्रकरणात प्रशासन व आयोग ठोस कारवाई करून आदिवासी कामगार किशोर पावरा यांना न्याय मिळवून देईल यासाठी सामाजिक आणि राजकीय संघटनांनी ठाम आशा व्यक्त केली आहे.(Tribal Atrocities Case)
मी रोजंदारीवर काम करण्यासाठी मुंबईत आलो होतो. मतदानाशी माझा काडीमात्रही संबंध नसताना मला बोगस मतदार ठरवून बेदम मारहाण करण्यात आली आणि जातीवरून अपमानित केले गेले. हा अन्याय मी आयुष्यभर विसरणार नाही. मात्र, आपल्या अनुसूचित जमातींसाठी न्यायप्रिय असलेल्या प्रशासनाकडून मला योग्य न्याय मिळेल, अशी मला पूर्ण आशा आहे.(Tribal Atrocities Case)
केशव पावरा
पीडित आदिवासी कामगार
दुर्बल घटकांवर दादागिरी आणि अमानुष मारहाण हेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खरे स्वरूप दर्शवते. पार्श्वभूमी न पाहता सामान्य आदिवासी कामगारावर हल्ला करणे अत्यंत चुकीचे व अस्वीकार्य आहे. यावर राष्ट्रीय अनुसूचित आयोग आणि प्रशासनाने तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करून दोषींवर ठोस कारवाई करावी.(Tribal Atrocities Case)