मुंबई : (Dr. Ramchandra Morwanchikar) प्रख्यात इतिहासकार तसेच लेखक डॉ. रामचंद्र मोरवंचीकर (Dr. Ramchandra Morwanchikar) यांचे शनिवार दि. १७ जानेवारी रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार पार पडले. मोरवचीकर (Dr. Ramchandra Morwanchikar) यांच्यावर काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.(Dr. Ramchandra Morwanchikar)
इतिहासाचा अभ्यास करणारे एक अभ्यासू व्यक्ती म्हणून मोरवंचीकर (Dr. Ramchandra Morwanchikar) यांची आगळीवेगळी ओळख जागतिक स्तरावर निर्माण केली होती. मराठवाडा त्या भोवतीची संस्कृती, इतिहास, नद्या यांच्यावर केलेला अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणारे म्हणून त्यांचं नाव इतिहास तज्ञांमध्ये घेतलं जातं. पैठण येथील उत्खननात त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं होतं. वेरूळ - औरंगाबाद महोत्सवाचे कार्यकारी अध्यक्ष, भारतीय जलसंस्कृती मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष म्हणून त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. विविध समितींच्या माध्यमातून इतिहास आणि संस्कृती या विषयावर त्यांचं काम प्रभावी ठरलं. विद्यापीठात अनेक वर्ष अध्यापन केल्यानंतर त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं "जीवन साधना" पुरस्कारानं देखील त्यांना सन्मानित केलं होतं. प्रा. डॉ. रामचंद्र मोरवंचीकर (Dr. Ramchandra Morwanchikar) यांनी सुमारे ४० वर्षे अध्यापन केले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल २०० संशोधनात्मक निबंध, तर इतिहास व इतर विषयांतील १६ ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी संशोधन केले.(Dr. Ramchandra Morwanchikar)
त्यांनी आपल्या लिखाणातून इतिहासाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकला. प्रागैतिहासिक काळातील पुरावे शोधत पाणी हे इतिहास लेखनाचे साधन आहे, असे सांगत मोरवंचीकरांनी जलसंस्कृतीची मांडणी केली. अश्मक - मूलक, पेतनिक मौर्य सत्ता आणि सातवाहन यातील वेगवेगळ्या राजे यांचा अभ्यास करणारा त्यांचा "प्रतिष्ठान ते पैठण" हा ग्रंथ खूप प्रभावी मानला जातो. इतिहासाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात चाळीस वर्ष काम केलं. या काळात त्यांनी पैठणमध्ये उत्खनन केलं, दौलताबाद किल्ल्यात एवढ्या उंचावर मोगल काळातील स्थापत्य अभियांत्रिकी कशी विकसित होते त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला होता. विशेषतः पैठण, दौलताबाद, अजिंठा लेणी या ऐतिहासिक वारसावर अभ्यासपूर्ण लिखाण करून नवीन पिढीला काहीतरी शिकायला मिळावं असं कार्य त्यांनी केलं. इतिहासाच्या वेगवेगळ्या बाजूंवर त्यांनी आवर्जून प्रकाश टाकत केलेले लेखन प्रेरणादायी आणि अभ्यासू मानलं जातं.(Dr. Ramchandra Morwanchikar)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.