मुंबई : (Aryabhatta Zero Bridge) मुंबईच्या आकाशरेषेत आणखी एक ऐतिहासिक अध्याय कोरला जात आहे. मेट्रो लाईन 2 बीवरील डी. एन. नगर ते मानखुर्दमधील मंडाले परिसराला जोडणाऱ्या ‘शून्य पुला’चे (Aryabhatta Zero Bridge) काम अंतिम टप्प्यात आले असून, या अद्वितीय पुलाचा शेवटचा पायलॉन यशस्वीपणे उभारण्यात आला आहे. या टप्प्यासह मुंबईच्या पायाभूत विकासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड गाठण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे.(Aryabhatta Zero Bridge)
या पुलाची रचना केवळ आधुनिक अभियांत्रिकीचे उदाहरण नाही, तर भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेला दिलेली एक आगळीवेगळी मानवंदना आहे. शून्याची संकल्पना जगाला देणाऱ्या थोर भारतीय गणितज्ञ आर्यभट्ट (Aryabhatta Zero Bridge) यांच्या विचारांना श्रद्धांजली म्हणून या पुलाची रचना ‘शून्य’ (Aryabhatta Zero Bridge) या आकारात करण्यात आली आहे. त्यामुळे हा पूल केवळ वाहतुकीचा मार्ग न राहता, भारताच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक ठरतो.(Aryabhatta Zero Bridge)
१३० मीटर लांबीचा हा केबल-स्टेड प्रकारातील पूल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना आहे. वाकोला नाल्यावर उभारलेल्या या पुलाचा मुख्य स्पॅन ८० मीटरचा असून, त्याला ४० मीटर उंच स्टील पायलॉनचा भक्कम आधार आहे. सुमारे ७५० टन स्टीलचा वापर करून हा पूल उभारण्यात आला असून, त्यामध्ये प्रगत अभियांत्रिकी कौशल्याचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे.(Aryabhatta Zero Bridge)
या पुलाच्या (Aryabhatta Zero Bridge) बांधकामामागे अभूतपूर्व मेहनत आणि तांत्रिक कौशल्य दडलेले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुमारे ५.९ किलोमीटरचे अत्यंत क्लिष्ट ऑन-साईट वेल्डिंग करण्यात आले असून, ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक होती. पुलाचा अंतिम ‘क्राऊन एलिमेंट’ बसवण्यासाठी ७५० मेट्रिक टन आणि ३५० मेट्रिक टन क्षमतेच्या दोन प्रचंड क्रेन वापरण्यात आल्या. सुपर-लिफ्ट सिस्टीम असलेल्या या क्रेनमुळेच ही अवघड कामगिरी यशस्वीपणे पूर्ण होऊ शकली.(Aryabhatta Zero Bridge)
शून्य पूल (Aryabhatta Zero Bridge) कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील कनेक्टिव्हिटीला नवे बळ मिळणार आहे. मेट्रो लाईन २ बी कॉरिडॉरवरील पाच स्थानके लवकरच प्रवाशांसाठी खुली होणार असून, त्यानंतर या पुलाचे महत्त्व अधिकच वाढणार आहे. हा पूल सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक महत्त्वाचा दुवा ठरणार असून, मुंबईच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनेल. पूर्व–पश्चिम मुंबईला जोडण्यासाठी उभारलेला हा शून्य पूल म्हणजे केवळ एक बांधकाम नाही, तर तो कार्यक्षमता, नावीन्य, आधुनिकता आणि सांस्कृतिक ओळखीचा संगम आहे. प्राचीन भारताच्या ज्ञानपरंपरेपासून ते आधुनिक मुंबईच्या वेगवान विकासापर्यंतचा हा प्रवास ‘शून्य पुला’च्या (Aryabhatta Zero Bridge) रूपाने आज प्रत्यक्षात साकार होत आहे.(Aryabhatta Zero Bridge)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.