कल्याण: (Malanggad) कल्याणमधील श्री मलंगगडावर जाण्यासाठी फ्युनिक्युलर सेवा आता भाविकांच्या सेवेत दाखल झाली आहे. ही देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर सेवा आहे. भाजपा आमदार किसन कथोरे आणि सुलभा गायकवाड यांच्या हस्ते रविवारी या सेवेचे लोकार्पण करण्यात आले. या सेवेमुळे भाविकांना मलंगगडावर जाणे अधिक सोपे , सुरक्षित आणि जलद होणार आहे. (Malanggad)
आमदार किसन कथोरे यांनी या पथदर्शी प्रकल्पाचा प्रस्ताव 2004 मध्ये मांडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. मात्र मधल्या काळात याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यानंतर 2012 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. परंतु विधानसभा क्षेत्राचे विभाजन झाल्यानंतर हा प्रकल्प रखडला होता. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी या कामाला गती देण्यासाठी निधी उपलब्ध क रु न दिला. यानंतर कामाला पुन्हा सुरूवात झाली आणि अखेर यंदा 2026 मध्ये या फ्युनिक्युलर प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. (Malanggad)
मलंगगडावर, हाजी मलंगला कल्याण, नवी मुंबईतून अनेक भाविक येतात. मलंगगडावर जाण्यासाठी अंदाजे 2600 पाय:या चढून जावे लागते. हा गड चढण्यासाठी जवळपास दोन तास लागतात. मात्र आता फ्युनिक्युलर ट्रेन भाविकांच्या सेवेत दाखल झाल्याने दोन तासाचे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पूर्ण करून जाता येणार आहे. या सुविधेच्या देखरेखीसाठी 70 जण असून 120 जण यातून प्रवास करू शकतात अशी माहिती आहे. (Malanggad)
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या सेवेला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई मंत्रलयातून फ्युनिक्युलर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. श्री मलंगगड यात्रेच्या पाश्र्वभूमीवर ही सेवा सुरू झाल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी मलंगगडावर जाण्यासाठी पाय:या चढून जावे लागत असे. ज्यामुळे अनेक भाविकांना त्रस होत असे. आता या फ्युनिक्युलर सेवेमुळे वृध्द आणि लहान मुलांनाही सहजपणे गडावर जाता येणार आहे. या सेवेमुळे मलंगगडावरील पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्यता आहे. (Malanggad)
चौकट- फ्युनिक्युलर सेवा काय आहे?
फ्युनिक्युलर ही एक प्रकारची केबल रेल्वे प्रणाली आहे. ट्रॉलीसारखी सुविधा आहे. गुरुत्वाकर्षण आणि केबल्सचा वापर करून मागे पुढे अशा दोन गाडय़ा एका उंच उतारावर चालवल्या जातात. फ्युनिक्युलर हा शब्द लॅटिन भाषेतील असून लहान दोरी असा त्याचा अर्थ होतो. फ्युनिक्युलर सेवा लिफ्ट आणि ट्रेन अशा दोघांची मिळून तयार झालेली सेवा आहे. (Malanggad)