मुंबई : (Atal Setu) अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवरुन (Atal Setu) प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी महत्त्वाची बातमी आहे. अटल सेतूच्या (Atal Setu) टोल टॅक्समध्ये पुढील एक वर्ष कोणतीही वाढ होणार नसल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शनिवार, दि.१७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय अटल सेतूवर (Atal Setu) प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे.(Atal Setu)
शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू (Atal Setu) जानेवारी २०२४ मध्ये सुरू करण्यात आला होता. अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल पुलाचा (Atal Setu) टोल २५० रुपये आहे. मुंबईकरांना पुढील १२ महिने, वर्षभर अतिरिक्त टोल भरावा लागणार नाही. अटल सेतूवरुन रोज प्रवासात करणाऱ्यांसाठी हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे.अटल सेतूमुळे (Atal Setu) मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर कमी झाले आहे. अटल सेतू बनण्याआधी मुंबई - नवी मुंबई असा प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या ट्रॅफिक समस्येचा सामना करावा लागत होता. मात्र अटल सेतूमुळे (Atal Setu) ही समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे. हा सहा लेन असलेला अटल सेतू सुरुवातीला मुंबई ट्रान्सहार्बर लिंक या नावाने उभारण्यात आला होता. पुढे या पुलाचे (Atal Setu) नामांतर अटल बिहारी वाजपेयी शिवडी - न्हावा शेवा अटल सेतू करण्यात आले.(Atal Setu)
एका चारचाकी वाहनासाठी एकेरी वाहतुकीसाठी २५० रुपये, तर परतीचा प्रवास असल्यास ३७५ रुपये टोल आकारण्यात येतो.
१८ हजार कोटींचा पूल
पुलाच्या बांधकामासाठी १७ हजार ८४० कोटी रुपये खर्च आला. त्यासाठी १ लाख ७७ हजार ९०३ मेट्रिक टन स्टील आणि ५ लाख ४ हजार २५३ मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आले आहे.(Atal Setu)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.