ठाण्यात मतटक्का वाढल्यामुळे भाजपने दिला सूचक इशारा
17-Jan-2026
Total Views |
ठाणे : (BJP Thane Victory) शिवसेनेसोबतच्या युतीमध्ये अवघ्या ३९ जागा लढवुन २८ जागांवर निर्विवाद यश मिळवत भाजपने ठाण्यात ७५ टक्के इतका उत्तम स्ट्राईक रेट राखला. तसेच, दोन राजकिय पक्षांचे अध्यक्ष पराभुत करून सभागृहात विरोधक दिसणार की नाहीत अशी परिस्थिती निर्माण केली. महाराष्ट्रभर अशी त्सुनामी आली की, गेल्या ४० वर्षामध्ये असे यश भाजपला मिळाले नव्हते, इतका मतटक्का वाढला आहे, त्यामुळे भविष्यात भाजप मोठी भरारी घेईल. असा विश्वास व्यक्त करून भाजप आमदार संजय केळकर यांनी, आम्ही एकत्र लढलोय त्यामुळे एकत्रच राहु, तरी अंकुश ठेवणारी एक शक्ती लागते, तेव्हा वेळ पडली तर आम्ही वेगळा विचार करू शकतो. असा सूचक इशाराही आमदार केळकर यांनी दिला.(BJP Thane Victory)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संजय केळकर, निवडणूक प्रभारी आमदार निरंजन डावखरे तसेच, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका (BJP Thane Victory) सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादीत केले. त्याबद्दल माहिती देण्यासाठी शनिवारी (ता.१७ जाने.) वर्तकनगर येथील भाजप विभागीय कार्यालयात सर्व विजयी नगरसेवकांसमवेत पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी दोन्ही आमदारांसोबत भाजपच्या प्रदेश महामंत्री माधवीताई नाईक, तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. यावेळी निवडणुक प्रभारी आ. डावखरे म्हणाले की, ठाण्यातील १७ प्रभागात ३९ ठिकाणी निवडणुक लढलो. (BJP Thane Victory) ठाण्याच्या प्रत्येक विधानसभेत कमळ फुललेले आहे. ७ जागा मुंब्य्रातील ३ जागा राबोडी तर, एक जागा कळवा डोंगरपट्यातील होत्या. पाच मंडळ अध्यक्ष तीन माजी मंडळ अध्यक्ष अशा आठ जणांना तिकिट दिले होते. विशाल वाघ सारख्या कार्यकर्त्याच्या पत्नीला पक्षाने उमेदवारी दिली. २०१७ मध्ये आमच्या तेवीस जागा होत्या त्यामध्ये ५ जागा भाजपने नव्याने मिळवल्या आहेत.नव्या चेहऱ्यांना संधी दिली, हे संघटन कौशल्याचे यश असल्याचे स्पष्ट करून भाजपच्या निर्धारनाम्यात दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करू, असे आ. डावखरे यांनी आश्वासित केले. तर आ. केळकर यांनी, प्रसारमाध्यमांनी चांगली साथ दिल्याचे सांगून युतीमध्ये भाजपच्या वाट्याला कमी जागा आल्या तरीही ७५ टक्के स्ट्राईक रेट मिळवला. केवळ धनिकच निवडून येतात असे नाही तर कामाच्या दृष्टीने गरीब कार्यकर्त्यालाही यावेळी संधी मिळाली, हा लोकशाहीच्या दृष्टीने मोठा संदेश आहे. ठाण्यात आम्ही १०० पार गेलो आहोत. गेल्या ४० वर्षामध्ये असे यश मिळालेले नव्हते. ठाण्यासह एमएमआर रिजनमध्येही भाजप क्रमांक एकवर आहे.अनेक बंडखोरांना यश मिळालेले नाही, कारण मतदार सुज्ञ आहेत. ठाण्यात मत टक्का (व्होट शेअर) वाढला आहे तेव्हा, भविष्यात भाजप मोठी भरारी घेईल.असा विश्वास व्यक्त करून आ. केळकर यांनी आमची युती असली तरी योग्य ते काम होईल यासाठी आग्रही राहू, असा सूचक इशारा दिला आहे.(BJP Thane Victory)
ठाणे महापालिका निवडणुकीत (BJP Thane Victory) मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी, चप्पा चप्पा भाजपा...चांद्यापासुन बांद्यापर्यंत हे ओवळा एक नंबर ते शीळ असे दुसऱ्या टोकापर्यत भाजपने ठाण्यात साध्य करून दाखवल्याचे म्हटले आहे. ठाण्यात भाजपचे १२ उमेदवार प्रथमच निवडणुकीच्या (BJP Thane Victory) रिंगणात होते तर उर्वरीत १६ रिपिटेड होते. कोपरी - पाचपाखाडीत विधानसभा क्षेत्रात चार, ठाणे शहर विधानसभेत १८ होते २१ केले.ओवळा - माजिवड्यात एकच होता आता ४ झाले. कळवा - मुंब्रा विधानसभा क्षेत्रात शुन्य होते तिथे आता शिळ प्रभाग २९ मध्ये भाजपचा एक निवडून आला आहे.माझी जिल्हाध्यक्ष पदाची ही तिसरी टर्म आहे, पहिल्यावेळी ४ नंतर ८ झाले, २०१७ मध्ये आठचे २३ झाले आणि आता २८ झाले. अशा प्रकारे शीळ ते वडवली...भाजपा वाढवली असे संदीप लेले म्हणाले.(BJP Thane Victory)