Mumbai Police Housing Township : ‘मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप’ला मंजुरी

पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय घरे

Total Views |
Mumbai Police Housing Township
 
मुंबई : (Mumbai Police Housing Township) दिवस-रात्र मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे राहणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुंबई शहर व उपनगरात पोलीस दलासाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने (Mumbai Police Housing Township) उपलब्ध करून देणाऱ्या ‘मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप’ (Mumbai Police Housing Township) प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.(Mumbai Police Housing Township)
 
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य पायाभूत सुविधा महामंडळामार्फत राबविण्यात येणार असून, सुमारे पाच कोटी चौरस फूट क्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे. या टाऊनशिपसाठी अंदाजे २० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या माध्यमातून आधुनिक, सुसज्ज आणि सुरक्षित पोलीस वसाहती उभारल्या जाणार आहेत.(Mumbai Police Housing Township)
 
हेही वाचा : MRSAC Portal : राज्यातील प्रत्येक प्रकल्पांच्या नोंदणीचे एकच पोर्टल 
 
प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीपैकी ३० टक्के निधी राज्य शासन देणार असून, उर्वरित ७० टक्के निधी एमएसआयडीसीमार्फत शासन हमीवर कर्ज स्वरूपात उभारण्यात येणार आहे.(Mumbai Police Housing Township) प्रकल्पाचा तांत्रिक व आर्थिक सुसाध्यता अहवाल तयार करणे आणि कामाची सुरुवात करण्यासाठी महामंडळाला १०० कोटी रुपयांचा प्राथमिक निधी देण्यासही मान्यता देण्यात आली आहे.(Mumbai Police Housing Township)
 
सध्या मुंबई पोलीस दलात ५१ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र उपलब्ध २२,९०४ सेवा निवासस्थानांपैकी सुमारे ३,७७७ घरे जीर्ण व वापरास अयोग्य आहेत.(Mumbai Police Housing Township) दरमहा शेकडो पोलीस कर्मचारी घरांसाठी अर्ज करतात, पण घरांची कमतरता असल्याने अनेकांना दूरवरून रोज प्रवास करावा लागतो. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने हजर राहावे लागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हे मोठे आव्हान ठरते. याच पार्श्वभूमीवर हा टाऊनशिप (Mumbai Police Housing Township) प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.(Mumbai Police Housing Township)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.