Rashtrapati Bhavan : राष्ट्रपती भवनातील ‘ॲट होम’साठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना निमंत्रण
17-Jan-2026
Total Views |
मुंबई : (Rashtrapati Bhavan) भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) आयोजित करण्यात येणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित ‘ॲट होम’ स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने या मान्यवरांना विशेष निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत.(Rashtrapati Bhavan)
या निमंत्रितांमध्ये रायगड जिल्ह्यातील सगुणा बागचे संस्थापक चंद्रशेखर भडसावळे, नांदेड येथील सर्पदंश तज्ज्ञ डॉ. दिलीप पुंडे, जळगावचे अरविंद गुलाब चौधरी आणि मुंबईतील स्टार्टअप उद्योजक आकाश शहा यांचा समावेश आहे. संबंधित क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.(Rashtrapati Bhavan)
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडणारा ‘ॲट होम’ हा समारंभ राष्ट्रपती भवनातील (Rashtrapati Bhavan) एक महत्त्वाचा आणि सन्माननीय कार्यक्रम मानला जातो. देशभरातील विविध क्षेत्रांत कार्यरत निवडक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, तज्ज्ञ आणि उद्योजक या समारंभाला उपस्थित राहतात.(Rashtrapati Bhavan)
महाराष्ट्रातील चार मान्यवरांना मिळालेल्या या निमंत्रणामुळे राज्यातील विविध क्षेत्रांतील कार्याची राष्ट्रीय स्तरावर नोंद घेण्यात आल्याचे दिसून येते.(Rashtrapati Bhavan)