ठाणे : ( BJP ) राज्यात सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला घवघवित यश मिळाले असल्याने ठाण्यात भाजप कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला.
राज्यात तसेच ठाणे जिल्ह्यात भाजप महायुतीला महानगरपालिकेत सत्ता स्थापण्याकरिता मोठे यश मिळाले, यामुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ठाण्यातील वर्तक नगर पक्ष कार्यालय येथे ढोल ताशा वाजवत, महिलांनी फुगड्या खेळत, फटाके वाजवत मोठा जल्लोष साजरा केला, यावेळी आमदार संजय केळकर,ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप केले तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले की, "ठाणेकर मतदारांचे आभार. आम्ही कमी जागा लढवून सुद्धा आमचा स्ट्राईकरेट चांगला झाला. ठाणेकरांच्या आणि ठाण्याच्या विकासाकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. त्यांच्या हॅप्पीनेस इंडेक्स वाढविण्याकरिता जीवाचे रान करू.”