मुंबई : (JNPA) देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (JNPA) हरित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा साध्य केली आहे. अलीकडील एअर क्वालिटी इंडेक्स आकडेवारीनुसार, बंदर परिसरातील प्रदूषणात सातत्याने घट होत असल्याचे स्पष्ट झाले असून, ही सुधारणा जेएनपीएच्या (JNPA) शिस्तबद्ध पर्यावरण व्यवस्थापनाचे ठोस फलित मानली जात आहे.(JNPA)
ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पीएम १० कणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ठळक घट नोंदवली गेली. विशेषतः नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये अनुक्रमे सुमारे ३३ टक्के आणि २९ टक्के घट दिसून आली, जी हिवाळ्यातील धुळीशी संबंधित प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण दर्शवते.पीएम २.५ कणांमध्येही नोव्हेंबर महिन्यात सुमारे २५ टक्के घट झाली असून, सूक्ष्म प्रदूषणावरही उपाययोजना परिणामकारक ठरत असल्याचे संकेत मिळाले आहेत. ही सकारात्मक बदलांची कहाणी ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झालेल्या यांत्रिक रस्ता स्वच्छता वाहने आणि धूळ दमन यंत्रांच्या तैनातीशी जोडलेली आहे. बंदरातील अंतर्गत रस्ते, कंटेनर टर्मिनल्स, पार्किंग क्षेत्रे तसेच कराल–साउथ गेट हा वाहतुकीने गजबजलेला मार्ग विशेष प्राधान्याने स्वच्छ केला जात आहे.(JNPA)
जेएनपीएचे (JNPA) अध्यक्ष गौरव दयाल यांनी सांगितले, “बंदराची प्रगती करताना आजूबाजूच्या परिसरातील जीवनमान उंचावणे ही आमची जबाबदारी आहे. हवेतील सुधारणा ही जमिनीवर राबवलेल्या ठोस उपाययोजनांची पावती आहे.” याशिवाय, ई-मोबिलिटी, केंद्रीकृत ट्रॅफिक कंट्रोल प्रणाली, आणि सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझामधून इंधन बचत व कार्बन उत्सर्जनात मोठी घट साधण्यात आली आहे. २०२५ मध्येच ६० टक्के नवीकरणीय ऊर्जेचा टप्पा गाठत जेएनपीएने (JNPA) राष्ट्रीय उद्दिष्टांनाही मागे टाकले आहे. हरित बंदराच्या दिशेने जेएनपीएची ही वाटचाल केवळ पायाभूत विकासाची नाही, तर शाश्वत भविष्याकडे नेणारी प्रेरणादायी पावले आहेत.(JNPA)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.