मुंबई : (BMC Elections) मुंबई महानगरपालिका निवडणूकीत (BMC Elections) आम आदमी पक्षाचा रेवडी वाटपाचा प्रयोग फसला असून पक्षाची पार दाणादाण उडाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणूकीत 'आप'ला एकाही जागेवर यश मिळाले नाही.(BMC Elections)
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत (BMC Elections) आम आदमी पक्षाने एकूण ६४ जागा लढवल्या. मात्र, या निवडणुकीत त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. या निवडणूकीत झालेल्या एकूण मतदानापैकी आम आदमी पक्षाला केवळ २० हजार ७५९ मते मिळाली. याचाच अर्थ एकूण मतदानापैकी या पक्षाला ०.३७९९ टक्के मते मिळाली.(BMC Elections)
खरेतर, आप ने दिल्लीप्रमाणेच मुंबईतही रेवडीवाटपाचे आमिष दाखवून मते मिळवण्याचा प्रयोग केला होता. मात्र, मुंबईकर जनतेने 'आप'च्या या आमिषाला प्रतिसाद न देता त्यांचा सुपडासाफ केल्याचे पाहायला मिळाले.(BMC Elections)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....