मुंबई : (MRSAC Portal) राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच अन्य संबंधित यंत्रणांसाठी प्रत्येक पायाभूत विकास प्रकल्पाची महाराष्ट्र संपत्ती पंजीकरण पद्धती अर्थात महासंपत्ती अंतर्गत नोंदणी करणे दि.१ ऑक्टोबर २०२५ पासून अनिवार्य करण्यात आले आहे. पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेला युनिक आयडी क्रमांक https://mhuid.mrsac.org.in या पोर्टलवरून प्राप्त करता येणार आहे.(MRSAC Portal)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील पायाभूत विकास कामांचे सुयोग्य व समन्वयित नियोजन व्हावे, सर्व भागांचा समतोल विकास साधावा तसेच अनावश्यक खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने नियोजन विभागामार्फत मार्स प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे राज्यातील सर्व सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांची एकमेव व प्रमाणित नोंदणी होणार आहे.(MRSAC Portal)
मार्स प्रणाली (MRSAC Portal) अंतर्गत नियोजन, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, प्रत्यक्ष अंमलबजावणी, देखभाल तसेच पुनर्बांधणी या सर्व टप्प्यांचे रिअल-टाईम निरीक्षण करणे शक्य होणार आहे. तसेच पीएम गतीशक्ती पोर्टलशी सुसंगतता राखून प्रकल्पांचे डुप्लिकेशन टाळणे, संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे आणि डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होईल.(MRSAC Portal)
या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एमएच युआयडी प्रणालीवर आधारित आयजीओटी कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर विशेष प्रशिक्षण मॉड्यूल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून राज्यातील अधिकारी व कर्मचारी एमएच युआयडी पोर्टलचा (MRSAC Portal) योग्य वापर, जीआयएस आधारित मॅपिंग, प्रकल्प नोंदणी, माहितीचे अद्ययावत व्यवस्थापन तसेच अहवाल सादरीकरण याबाबत सक्षम होतील. महासंपत्ती प्रणालीमुळे राज्यातील पायाभूत विकास कामांमध्ये पारदर्शकता, सुसूत्रता व कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून, महाराष्ट्राच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाला नवी दिशा मिळणार आहे.(MRSAC Portal)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.