नवी दिल्ली/मालदा : (Vande Bharat) भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या वंदे भारत (Vande Bharat) स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. हावडा ते गुवाहाटी (कामाख्या) या महत्त्वाच्या मार्गावर धावणारी ही अत्याधुनिक स्लीपर वंदे भारत ट्रेन म्हणजे वेग, आराम आणि तंत्रज्ञान यांचे अद्वितीय मिश्रण ठरणार आहे. शनिवार,दि.१७ रोजी पश्चिम बंगालमधील मालदा येथून या ट्रेनचे लोकार्पण करताना पंतप्रधानांनी रेल्वे आणि रस्ते क्षेत्रातील ३,२५० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पायाभूत प्रकल्पांचीही पायाभरणी केली.(Vande Bharat)
आतापर्यंत देशभर धावणाऱ्या वंदे भारत (Vande Bharat) ट्रेनमध्ये केवळ चेअर कार सुविधा होती. मात्र, दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांची गरज ओळखून आता स्लीपर वंदे भारत ट्रेन सादर करण्यात आली आहे. ही ट्रेन (Vande Bharat) १८० किमी प्रतितास वेगाने धावण्यासाठी डिझाइन करण्यात आली असली तरी सुरुवातीला ती सुमारे १२० ते १३० किमी प्रतितास वेगाने धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे हावडा–गुवाहाटी प्रवासाचा कालावधी सुमारे अडीच तासांनी कमी होणार असून उत्तर-पूर्व भारताचा देशाच्या मुख्य प्रवाहाशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे.(Vande Bharat)
ही स्लीपर वंदे भारत (Vande Bharat) ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित असून प्रवाशांना ‘हवाई प्रवासासारखा अनुभव’ देण्याचा तिचा उद्देश आहे. ट्रेनमधील बर्थ एर्गोनॉमिक डिझाइनचे असून जागतिक दर्जाच्या सस्पेंशन सिस्टीममुळे प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. स्वच्छतेच्या दृष्टीनेही ही ट्रेन एक पाऊल पुढे आहे. उन्नत कीटाणुनाशक तंत्रज्ञानामुळे ९९ टक्के जंतू नष्ट होतात, तर प्रत्येक प्रवाशासाठी स्वच्छ चादरी आणि टॉवेल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.(Vande Bharat)
सुरक्षेच्या बाबतीतही वंदे भारत (Vande Bharat) स्लीपर ट्रेन अत्याधुनिक आहे. संपूर्ण प्रवासादरम्यान स्वयंचलित स्लायडिंग दरवाजे बंद राहतील आणि फक्त स्टेशनवर पोहोचल्यानंतरच उघडतील. ट्रेनमध्ये इमरजन्सी टॉक-बॅक युनिट देण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी थेट ट्रेन मॅनेजर किंवा लोको पायलटशी संवाद साधू शकतील. मॉडर्न वॉशरूममध्ये सेन्सरयुक्त नळ, सुधारित साफसफाईची सोय यामुळे स्वच्छतेचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यात आला आहे.(Vande Bharat)
या मार्गावर धावणाऱ्या स्लीपर वंदे भारत (Vande Bharat) ट्रेनचे भाडेही जाहीर करण्यात आले आहे. ३एसी प्रवासासाठी २,३०० रुपये, २एसीसाठी ३,००० रुपये तर १एसीसाठी ३,६०० रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले असून या भाड्यात जेवणाचाही समावेश आहे. तुलनेने कमी वेळ, अधिक आराम आणि आधुनिक सुविधा यामुळे हे भाडे प्रवाशांसाठी परवडणारे ठरणार आहे.(Vande Bharat)
धार्मिक पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांना चालना देणारी ही स्लीपर वंदे भारत ट्रेन म्हणजे ‘नव्या भारताच्या’ वेगवान विकासाचे प्रतीक आहे. रेल्वे प्रवासाची व्याख्या बदलणारी ही सेवा उत्तर-पूर्व भारताच्या विकासाला नवे बळ देईल, यात शंका नाही.(Vande Bharat)
आज बंगालच्या या पावन भूमीवरून आज भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने आणखी एक नवीन पाऊल उचलण्यात आले आहे. आजपासून भारतात वंदे भारत स्लीपर ट्रेनचे अनावरण होते आहे. या नव्या वंदे भारत स्लीपर ट्रेन देशवासीयांच्या लांब पल्ल्याच्या प्रवासाला अधिक सुखकर आणि आरामदायक बनवेल. मी अनेक प्रवाशांशी संवाद साधला. प्रत्येकजण हेच सांगत होता की, आम्हाला या ट्रेनने प्रवास करत असताना अद्भुत आनंद मिळाला.(Vande Bharat)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.