BJP's Victory in Wada : वाड्यात भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
16-Jan-2026
Total Views |
वाडा : (BJP's Victory in Wada) वाडा नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्षासह ११ नगरसेवक निवडून येऊन वाडा नगरपंचायतीवर (BJP's Victory in Wada) निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे.या नवनिर्वाचित नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार सोहळा भाजपच्या वतीने आज शुक्रवार (ता.१६) रोजी आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार सोहळा भाजपचे जेष्ठ नेते बाबाजी काठोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी तत्कालीन आदिवासी विकास मंत्री स्वर्गीय विष्णू सवरा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.(BJP's Victory in Wada) या सोहळ्यात नगराध्यक्षा रिमा गंधे, उपनगराध्यक्ष मनिष देहेरकर व नगरसेवक यांचा शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.(BJP's Victory in Wada)
वाडा नगरपंचायतीच्या निवडणूकीत (BJP's Victory in Wada) वाडा शहरातील जनतेने भाजपच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार रिमा गंधे यांच्यासह १७ पैकी ११ नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आपली पहीली पसंती देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी केले आहे.वाडा नगरपंचायतीवर (BJP's Victory in Wada) कमळ फुलले असून भाजप १ नंबरचा पक्ष ठरला आहे.या सत्कार सोहळ्याप्रसंगी कुडूस मंडल अध्यक्ष मोनिष पाटील, वाडा शहर मंडळ अध्यक्ष स्वप्निल रोठे,वाडा पूर्व मंडल अध्यक्ष संतोष पाटील, कंचाड मंडल अध्यक्ष संदीप गोवारी,नयना इंगळे, सुजाता कडव, ज्योती भानुशाली, पुजा भानुशाली आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(BJP's Victory in Wada)