मुंबई : (NMMC Election Results 2026) राज्यातील २९ महापालिकांपैकी २६ ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. नवी मुंबईतील महासंग्रामात भाजपचे गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. नवी मुंबई महापालिकेच्या एकूण जागांपैकी भाजपने ६२ जागांवर आघाडी घेतली असून, शिवसेनेला केवळ २४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांना अपेक्षित यश मिळू शकलेले नाही.(NMMC Election Results 2026)
माजी महापौर आणि वनमंत्री गणेश नाईक यांचे पुतणे सागर नाईक यांचा विजय झालेला आहे. सागर नाईक यांनी आपल्या प्रभागात स्पष्ट फरकाने विजय मिळवत नाईक कुटुंबाची नवी मुंबईवरील पकड पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. नवी मुंबईत शिवसेनेने संपूर्ण ताकद लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. मात्र, संघटनात्मक ताकद, स्थानिक नेतृत्व आणि विकासकामांचा मुद्दा पुढे करत भाजपने मतदारांचा विश्वास संपादन केला.