Municipal Corporation Election Results 2026 : देवाभाऊंची जादू पुन्हा चालली! राज्यातील १३ महापालिकांमध्ये भाजपची एकहाती सत्ता

    16-Jan-2026   
Total Views |
Maharashtra Municipal Corporation Election Results 2026

मुंबई : (Maharashtra Municipal Corporation Election Results 2026) महाराष्ट्राच्या शहरी राजकारणाला भाजपने मोठा धक्का दिला आहे. इचलकरंजी, पुणे, धुळे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, पनवेल, उल्ल्हासनगर, मीरा-भाईंदर, नाशिक, नागपूर, नांदेड, सांगली आणि जालना या तब्बल १३ महानगरपालिकांमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे.
Maharashtra Municipal Corporation Election Results 2026

या निकालांचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले असून, राज्यभरातील २९ महत्त्वाच्या महापालिकांपैकी १३ महापालिकांमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. इचलकरंजीपासून नागपूरपर्यंत आणि नाशिकपासून नवी मुंबईपर्यंत कमळ फुलले आहे. या निकालांमुळे राज्यातील भाजपचे वर्चस्व अधिक ठळक झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव पुन्हा एकदा निर्णायक ठरल्याची चर्चा सुरु आहे.
Maharashtra Municipal Corporation Election Results 2026

महानगरपालिका निवडणुकीच्या विजयाचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाला आणि धडाडीच्या नेतृत्वाला दिले जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या पद्धतीने निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली आणि प्रत्येक शहराच्या स्थानिक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून रणनीती आखली, प्रचारसभा घेतल्या, ही त्याचीच फलश्रुती असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
Maharashtra Municipal Corporation Election Results 2026
Maharashtra Municipal Corporation Election Results 2026

खालील १३ महापालिकेत भाजपची सत्ता:

१) इचलकरंजी
२) पुणे
३) धुळे
४) पिंपरी-चिंचवड
५) नवी मुंबई
६) पनवेल
७) उल्ल्हासनगर
८) मीरा-भाईंदर
९) नाशिक
१०) नागपूर
११) नांदेड
१२) सांगली
१३) जालना

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\