मुंबईत महापालिकेवर भाजपचाच भगवा; २५ वर्षानंतर शिवसेनेचा किल्ला ढासळला

    16-Jan-2026
Total Views |

मुंबई : (BMC Elections) 'प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे' असे म्हणतात. आज ही म्हण भारतीय जनता पक्षाच्या मुंबई महानगरपालिकेतील (BMC Elections) ऐतिहासिक विजयाला तंतोतंत लागू होते. भाजप-शिवसेना-रिपाइं(आ) या महायुतीने जागा जिंकत उद्धव ठाकरे यांची २५ वर्षांची सत्ता मोडून काढली आहे.()

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Elections) स्थापनेपासून जवळपास ३० वर्षांहून अधिक काळ सत्तेचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या भाजपला यावेळी घवघवीत यश मिळाले. यंदा मुंबई महानगरपालिकेत (BMC Elections) पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमीत साटम यांनी दिलेला 'मुंबई महापालिका ही एका परिवाराची जहांगीर नाही' हा नारा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांसमोर मांडलेले विकासाचे व्हिजन ही दोन कारणे मुंबईत सत्ता मिळवण्यासाठी फार महत्वाची ठरली. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर झालेला मुंबईचा सर्वांगीण विकास आणि मुंबईकरांचे जीवन सुलभ करण्यासाठी सरकारने उचललेल्या प्रत्येक पावलाला मुंबईकरांनी साथ दिल्याचे या निकालावरून स्पष्ट होते.(BMC Elections)

मशाल विझली, इंजिनही जळून खाक

मुंबई महापालिका निवडणूकीसाठी २० वर्षानंतर मशाल आणि इंजिन सोबत आले. यंदा मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढवण्याची अनोखी शक्कल लढवली. परंतू, गेल्या २५ वर्षांतील मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे यांनाही खड्ड्यात घेऊन गेला. अर्थात मशालीच्या आगीत इंजिनही जळून खाक झाल्याचे दिसते.(BMC Elections)

मराठी माणसाने ठाकरेंना नाकारले

मुंबईत फक्त मराठी माणसासाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना मराठी माणसानेच इंगा दाखवला. मागची २५ वर्षे विरुद्ध गेली ३ ते ४ वर्षे हा फरक मुंबईतील मराठी माणसापासूनही लपला नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंचे भावनिक राजकारण, मराठीच्या मुद्यावरून सुरु असलेला कांगावा आणि मतांसाठी सुरु असलेले लांगूलचालन मुंबईकरांनी साफ नाकारले आहे.(BMC Elections)

ठाकरेंच्या पराभवाची प्रमुख कारणे कोणती?

गेल्या अनेक दशकांपासून मुंबई महापालिकेवर सत्ता असूनही सामान्य मुंबईकरांच्या प्रश्नांवर ठोस पावले उचलण्यात आली नाही. त्यामुळे रस्ते, पाणी, ड्रेनेज, वाहतूक, झोपडपट्टी पुनर्विकास या मूलभूत मुद्द्यांवर मुंबईकरांची नाराजी होती. याशिवाय गेल्या काही निवडणूकांमध्ये (BMC Elections)  उद्धव–राज ठाकरे यांची अस्पष्ट राजकीय भूमिका हेदेखील त्यांच्या पराभवाचे मोठे कारण आहे. अनेक दिवस मुंबईत स्वतंत्र लढणार की, एकत्र हेच स्पष्ट न झाल्याने दोघांच्या युतीविषयी संभ्रम निर्माण झाला. शिवाय मागील काळात केलेले एकमेकांविरोधातील वक्तव्ये बरीच व्हायरल झाली. एकेकाळी मुंबईतील मराठी माणसाचा आवाज असलेला मुद्दा कालांतराने फक्त भाषणांपुरता मर्यादित राहिल्याने मराठीचा मुद्दा बोथट झाला. नोकर्‍या, घरांच्या किमती, स्थलांतर, शिक्षण प्रश्नांवर ठोस धोरण न दिसल्याने मराठी मतदारांचा विश्वास कमी झाला. उद्धव ठाकरे यांच्यावर विशिष्ट मतदार घटकांवर जास्त भर दिल्याचा आरोप झाला. यामुळे पारंपरिक शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी मतदार दुरावले, त्या तुलनेत अपेक्षित प्रमाणात नवे मतदार जोडले गेले नाहीत.(BMC Elections)

विकास विरुद्ध भावनिक राजकारण

मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू, पुनर्विकास, पायाभूत सुविधा या महायुती सरकारने केलेल्या कामांमुळे विकास विरुद्ध भावनिक राजकारण यात मुंबईकरांनी विकासाला निवडले. तसेच कोरोना काळात उद्धव ठाकरे यांची ‘वर्क फ्रॉम होम मुख्यमंत्री’ अशी बनलेली प्रतिमा, कोरोनाकाळातील प्रशासन, महापालिकेतील खर्च, निर्णयप्रक्रिया यावर झालेली टीका आणि सातत्याचा अभाव यामुळे भावनिक राजकारण, संभ्रमित नेतृत्व यावर मात करत मुंबईकरांनी कार्यक्षमतेला कौल दिला.(BMC Elections)