BMC Election 2026 : मतमोजणी सुरू, पहिला कौल हाती; मुंबईत कोणत्या पक्षाची किती जागांवर आघाडी?

    16-Jan-2026   
Total Views |

BMC

मुंबई : (BMC Election 2026) 
मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडले, त्यानंतर आज म्हणजे १६ जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह राज्यातील २ हजार ८६९ प्रभागांसाठी मतदान पार पडले आहे. मुंबईतील १७०० उमेदवारांसह राज्यभरात १५,९३१ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या निकालावर सर्वांची नजर असणार आहे.

मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिला कौल हाती आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून निवडणुकीचे कल समोर येत आहेत. भाजपा सध्या आघाडीवर आहे.
 
मुंबईत कोणत्या पक्षाची किती जागांवर आघाडी?

भाजपा- १६
 
शिवसेना शिंदे- १२
 
शिवसेना ठाकरे-१०
 
मनसे - ५

राष्ट्रवादी शरद पवार-०
 
राष्ट्रवादी अजित पवार-०
 
काँग्रेस-४
 
इतर-१

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\