मुंबई :( bjp) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 'शिवसेनेची खान हवा की, बाण' हा नारा छत्रपती संभाजीनगरमध्ये दिला होता. त्यानंतर अनेक वर्षे छत्रपती संभाजीनगरचे राजकारण याच नाऱ्याभोवती फिरस राहिले. परंतू, दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी तिथे खान निवडल्याने आता मराठवाड्यात त्यांच्या पक्षाचे अस्तित्व संपल्यात जमा आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकांचे निकाल समोर आले असून यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजपच सत्तेच्या जवळ पोहोचला आहे. दरम्यान, मराठवाड्यातही भाजपने आपला दबदबा कायम ठेवला. विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात राबवलेल्या कृषी सन्मान योजना आणि दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी मांडलेले व्हिजन यामुळे तिथला मतदार त्यांच्याकडे आकर्षित झाला. दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून भाजपला भरभरून पाठिंबा दिला.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे यांच्यावर विशिष्ट समाजाच्या मतांचे लांगूलचालन केल्याचा आरोप झाला. त्यानंतर आता महानगरपालिका निवडणूकांमध्ये त्यांच्या पक्षात झालेले पक्षप्रवेश चर्चेचा विषय ठरले. बलात्काऱ्यांना आसरा देणारा चेहरा अशी ओळख असलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक चंगेज मुल्तानी यांना उद्धव ठाकरेंनी पक्षात प्रवेश देऊन त्यांचे पुत्र झीशान चंगेज मुलतानी याला उमेदवारी दिली. तर औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करणाऱ्यास विरोध करणाऱ्या आणि दंगल पसरवणारा नेता अशी ओळख असलेल्या रशीद मामू यांनाही तिकीट दिले. मात्र, ज्या समाजाच्या मतासांठी उद्धव ठाकरे यांनी ही खेळी केली त्या समाजाने तर त्यांचे नेतृत्व नाकारलेच, शिवाय इतर समाजातील लोकांनाही त्यांच्याकडे पाठ फिरवली. एकेकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ता गाजवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता बोटावर मोजण्याइतक्याही जागा मिळाल्या नाहीत.
खैरे विरुद्ध दानवे संघर्ष भोवला
मराठवाड्यात उबाठा गटाचे दोन दिग्गज नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील संघर्ष सर्वपरिचित आहे. महापालिका निवडणूकीच्या आधीही रशीद मामू यांच्या पक्षप्रवेशावरून हा संघर्ष प्रकर्षाने उफाळून आला होता. परंतू, तरीही चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याचा विरोध डावलून फक्त लांगूलचालनासाठी रशीद मामू यांना पुढे आणण्यात आले. पण मतदारांनी मामूंना साथ दिली नाही. उबाठा गटाला विरोधी पक्षात बसण्याइतक्याही जागा मिळाल्या नाही. तर, आता एमआयएम पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे आल्याचे दिसते. उद्धव ठाकरे यांनी खान जवळ केल्याने हिंदू मतदार त्यांच्यापासून दुरावला गेला.
जालन्यात पहिली पसंती भाजपला
जालना महानगरपालिकेच्या निर्मितीनंतर यंदा पहिल्यांदाच निवडणूक पार पडली. इथे भाजप आणि शिवसेने स्वतंत्र लढली असतानाही भाजप पहिल्या क्रमांकावर राहिली. भाजपचे जेष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वात लढवलेल्या जालना महापालिकेत भाजपला मोठे यश मिळाले. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना आणि परभणीत घेतलेल्या जाहीर सभेत विकासाचे व्हिजन मांडले. त्यामुळे साहाजिकच मतदाराने विकासाला पसंती दर्शवली.
नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी विजयश्री खेचला
नांदेडमध्ये खासदार अशोक चव्हाण यांनी विकासाच्या मुद्यावर विजयश्री खेचून आणला. यावेळी त्यांनी सभा, बैठकांचा धडका लावत आपली ताकद पणाला लावली होती. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोबत घेत ते मतदारांपर्यंत पोहोचले. ही निवडणूक म्हणजे अशोक चव्हाण यांच्यासाठी अस्तित्त्वाची लढाई होती. या निवडणूकीत स्वबळावर लढला असतानाही भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरला. याऊलट काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन असल्याचे दिसले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....