Social Justice Honor : रविदास महाराज मंदिरात वकील नितीन सातपुते यांचा विशेष सामाजिक सन्मान
16-Jan-2026
Total Views |
पुणे : (Social Justice Honor) जगद्गुरू संत शिरोमणी रविदास महाराज मंदिर, तिसरे स्थान, धर्मस्थान कात्रज, पुणे येथे दि ११ रोजी सामाजिक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात चर्मकार समाजातील वकील नितीन सातपुते यांचा अनुसूचित जाती-जमाती व बहुजन समाजावर झालेल्या अन्यायाविरुद्ध उचललेल्या आवाजासाठी तसेच अन्यायाविरोधातील प्रतिकारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन विशेष सन्मान करण्यात आला.(Social Justice Honor)
या वेळी समाजासाठी कार्य (Social Justice Honor) करणाऱ्या इतर वकिलांचाही त्यांच्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमात समाजातील अन्यायाविरोधातील लढा, संघटित समाजशक्ती आणि सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला.(Social Justice Honor)
कार्यक्रमास संत सुखदेवजी महाराज यांनी उपस्थित राहून अखिल भारतीय रविदासीया धर्म संघटनेच्या माध्यमातून जागतिक पातळीवर सुरू असलेल्या धर्मप्रसार, समाजजागृती व संघटनात्मक कार्यावर विचार मांडत उपस्थितांना मार्गदर्शन केले.(Social Justice Honor)
या सामाजिक मेळाव्याची संकल्पना अमोल वाघमारे, खंडू बनसोडे आणि मोतीराम कांबळे यांनी मांडून कार्यक्रमाचे (Social Justice Honor) आयोजन केले होते. तसेच रामदास, अमोल वाघमारे यांच्या पत्नी सौ. वाघमारे, तिसरे धर्मस्थानाचे सेवादार रोशनलाल यांच्यासह अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या सर्व समाजबांधवांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.(Social Justice Honor)