मुंबई : (Bangladeshi Migrant Women Arrested) मुंबईत बेकायदेशीररीत्या घुसखोरी करणाऱ्या दोन बांगलादेशी (Bangladeshi Migrant Women Arrested) महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या दोघींना गेल्या ऑगस्टमध्येच भारतातून हाकलून लावण्यात आले होते, तरीही त्यांनी पुन्हा एकदा बेकायदेशीररीत्या सीमा ओलांडून मुंबईत येऊन वास्तव्य सुरू केले होते. कोलाबा पोलिसांनी झुलेखा शेख हिला गेटवे ऑफ इंडिया परिसरातून, तर बिल्किस बेगम कफ परेड भागातून ताब्यात घेतले आहे.(Bangladeshi Migrant Women Arrested)
मिळालेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी रोजी झुलेखाला गेटवे ऑफ इंडिया परिसरात फिरत असताना अटक करण्यात आली. कोलाबा पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाला त्या ठिकाणी एक बांगलादेशी महिला संशयास्पद वागत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस तेथे पोहोचल्यावर तिने स्वतःचे नाव झुलेखा जमाल शेख असल्याचे सांगितले.(Bangladeshi Migrant Women Arrested) चौकशीत तिने आपण बांगलादेशातील जेसोर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे कबूल केले. याशिवाय, ऑगस्ट महिन्यात आग्रिपाडा पोलिसांनी तिला भारताबाहेर पाठवले होते, मात्र ती भारत-बांगलादेश सीमेवरील जंगलांमधून बेकायदेशीरपणे पुन्हा भारतात आली आणि कामाठीपुरा परिसरातील फुटपाथवर राहू लागली.(Bangladeshi Migrant Women Arrested)
दुसरी अटक कफ परेड परिसरात झाली, जिथे बिल्किस बेगम भाड्याच्या घरात आरामात राहत होती. तिने सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि अस्पष्ट उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी तिच्या घरी छापा टाकल्यानंतर सत्य उघड झाले. बिल्किसच्या मोबाईल फोनमध्ये बांगलादेशचे राष्ट्रीय ओळखपत्र तसेच त्यासंबंधित अनेक छायाचित्रे आढळली. तिलाही ऑगस्टमध्ये मुंबई गुन्हे शाखेने भारताबाहेर पाठवले होते, तरी ती पुन्हा परत आली होती.(Bangladeshi Migrant Women Arrested)
या दोघींकडेही पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर कोणतीही वैध प्रवासाची कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, त्यांना सीमा ओलांडण्यास कोणी मदत केली आणि मुंबईत अशा बेकायदेशीर कारवायांमध्ये (Bangladeshi Migrant Women Arrested) गुंतलेली टोळी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.(Bangladeshi Migrant Women Arrested)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक