मुंबई : (BMC Elections) राज्यभरातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. अनेक आरोप-प्रत्यारोप, बोटावरील शाई, दुबार मतदार, ईव्हीएम, वादविवाद, हाणामारी आणि गोंधळाने भरलेल्या महानगरपालिका निवडणूकांसाठी (BMC Elections) गुरुवारी सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात झाली आणि सांयकाळी ५.३० पर्यंत मतदान पार पडले.(BMC Elections)
लोकसभा आणि विधानसभेत असलेली महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत यावेळी पाहायला मिळालेली नाही. या निवडणूकांमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या युत्या आघाड्या दिसल्या. अनेक ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात उभे होते तर, बऱ्याच ठिकाणी एकमेकांचे विरोधक सोबत आले होते. विशेषत: मुंबईत भाजप-शिवसेना-रिपाइं ही महायुती आणि ठाकरे बंधूंसह शरद पवार गट या राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.(BMC Elections)
दरम्यान, ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदारांनी १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद केले असून २९ महानगरपालिकांवर कुणाची सत्ता येणार, याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदार रांगेत उभे होते.(BMC Elections)
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मतदानानंतर मतदारांच्या बोटावरची शाई निघून जात असल्याचा आरोप केला. अनेकांनी बोटावरची शाई निघतानाचे व्हिडीओही काढले. त्यानंतर यावरून बरेच राजकीय वाद-प्रतिवाद पाहायला मिळाले. तर, सोलापूरसह विविध भागांत ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा झाला. धुळे येथे भोंगळ कारभार सुरु असल्याचा आरोप करत उमेदवार आणि कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. शिवाय मतदान केंद्र बदलल्यानेही अनेक मतदारांचा गोंधळ उडाला.(BMC Elections)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....