Ameet Satam : पराभव दिसत आहे म्हणून उद्धव ठाकरे यांचे रडगाणे सुरू -आमदार अमीत साटम

    15-Jan-2026
Total Views |
Ameet Satam
 
मुंबई : (Ameet Satam) "उद्याचा पराभव दिसल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे रडगाणे म्हणजे कव्हर फायरिंग आहे. त्यामुळे निवडणूक आयोग, मतदार याद्या यावर बोलून दिशाभूल केली जात आहे." असे प्रतिपादन भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम (Ameet Satam) यांनी गुरुवार दि.१५ रोजी केले.(Ameet Satam)
 
"मुंबईतील मराठी माणूस आणि तमाम मुंबईकरांनी विकासाच्या राजकारणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भरघोस आशिर्वाद देताना दिसत असल्याने आजचा दिवस हा मुंबईच्या भविष्याच्या दृष्टीने ऐतिहासिक असणार आहे."असेही साटम (Ameet Satam) यांनी स्पष्ट केले.
 
हेही वाचा : State Election Commission : शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही; निवडणूक आयोगाकडून स्पष्ट  
 
तसा तर रुदालीच्या रडण्याचा मुहूर्त उद्याचा आहे.
पण बहुधा आजपासूनच कल त्यांच्या हाती यायला सुरुवात झाली असावी.‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’च्या प्रचंड यशानंतर ‘माझा पराभव, माझी स्क्रिप्ट’ हे सुरु झाले आहे.(Ameet Satam)
 
तुम्ही कितीही रडा, पण, त्यात मुंबईकर फसणार नाही.
किंबहूना मुंबईकर आता फसत का नाही, याचमुळे तुमचे रडणे सुरु आहे.काही तर उद्यासाठी राहू द्या उद्धवजी!" असा घणाघात भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी गुरुवार दि.२५ रोजी केला आहे.(Ameet Satam)