Religious Tension In Telangana : तेलंगणात धार्मिक तणाव! पुरानापुलमध्ये मंदिराची तोडफोड; भाजपाचा काँग्रेसवर हल्लाबोल

    15-Jan-2026   
Total Views |
Religious Tension In Telangana
 
मुंबई : (Religious Tension In Telangana) तेलंगणाची (Religious Tension In Telangana) राजधानी हैदराबादच्या पुरानापुल परिसरात उशिरा रात्री एका मंदिरात अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. मंदिराची तोडफोड झाल्याची बातमी पसरताच स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संताप पसरला व घटनास्थळी मोठी गर्दी जमली. संतप्त जमावाने परिसरात गोंधळ घातला. पोलीस पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करू लागली, त्यानंतर खासदार असदुद्दीन ओवैसीही घटनास्थळी दाखल झाले.(Religious Tension In Telangana)
 
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील तोडफोडीमुळे संतप्त जमावाने घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे तणाव अधिक वाढला. दोन समुदाय आमनेसामने आले. जमावाने एका दुचाकीला आग लावली तसेच इतर काही वाहनांचेही नुकसान केले. यामुळे मूसी नदीच्या काठावर असलेल्या वर्दळीच्या चौकात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.(Religious Tension In Telangana)
 
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या मूर्तीच्या दुरुस्तीची पाहणीही केली असून नागरिकांना कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. गुरुवारी सकाळी एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी स्थानिक नागरिक आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून लोकांना शांतता राखण्याचे व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.(Religious Tension In Telangana)
 
हेही वाचा : Bangladeshi Migrant Women Arrested : मुंबईत दोन बांगलादेशी महिला अटकेत! भारताबाहेर पाठवूनही पुन्हा केली घुसखोरी
 
पोलीसांनी सांगितले की, तोडफोड करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात शांतता राखण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्या पसरवू नयेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. तेलंगणात हिंदू मंदिरांचा सुनियोजित अपमान सुरू असल्याचे भाजपाने म्हटले आहे. काँग्रेस सरकारने आपल्या मतपेढीला वाचवण्यासाठी कट्टरपंथी शक्तींना मोकळे रान दिल्याचा आरोपही भाजपाने केला आहे.(Religious Tension In Telangana)
 
तेलंगणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष एन. रामचंद्र राव यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी काँग्रेस सरकारवर निशाणा साधत म्हटले की, सरकारच्या निष्क्रियतेचा फायदा घेत उग्रवादी घटक तेलंगणात बळावत आहेत. काँग्रेस आपली मतपेढी दुखावेल म्हणून कारवाई करत नाही, त्यामुळेच मंदिरांचे अपवित्रीकरण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक गप्प असताना भाजप मात्र मंदिरांच्या रक्षणासाठी ठामपणे उभी राहील, असेही त्यांनी सांगितले.(Religious Tension In Telangana)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक