CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात केवळ विकास चालणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    15-Jan-2026   
Total Views |
CM Devendra Fadnavis
 
नागपूर : (CM Devendra Fadnavis) महाराष्ट्रात केवळ विकास चालेल. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी असून हा विकास डोळ्यापुढे ठेवूनच जनता मतदान करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मतदान केल्यानंतर व्यक्त केला.(CM Devendra Fadnavis)
 
नागपूर येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, "स्थानिक स्वराज्य संस्था या लोकशाहीचा पाया आहे. लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे. मतदान हा केवळ अधिकार नसून ते आपले कर्तव्य आहे. मतदान न करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचे पालन न करण्यासारखे आहे. मी मतदान केले असून सर्वांनी भरघोस मतदान करावे, अशी विनंती करतो. चांगले मतदान झाले तर चांगले लोक निवडून येतो आणि त्यानेच विकास होतो. चांगली शहरे तयार करायची असल्यास महाराष्ट्रातील २९ महापालिकेतील सर्व जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान करावे."(CM Devendra Fadnavis)
 
हवे तर ऑईल पेंट वापरा
 
"शाई आणि पेन या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ठरवतो. यापूर्वीही अनेकवेळा मार्कर पेन वापरला आहे. परंतू, कुणाचा काही आक्षेप असल्यास निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यावे. त्यांना अजून काही वापरायचे असल्यास ते वापरावे. ऑईल पेंट वापरायचा असल्यास तोसुद्धा वापरावा. निवडणूका निष्पक्ष व्हायला हव्यात. पण प्रत्येक गोष्टीत संविधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे चुकीचे आहे. मात्र, आमचा विजय पक्का दिसत असल्याने काही लोक उद्याचा निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे," असेही ते म्हणाले.(CM Devendra Fadnavis)
 
हेही वाचा : बिगबॉसच्या घरात झाली चोरी, तर सागर-तन्वीमध्ये जुंपली, पाहा नेमकं काय घडलं? 
 
नागपूरात काँग्रेसकडून गुंडांना तिकीट
 
"नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाने अतिशय नावाजलेल्या गुंडांना तिकीटे दिली असून अशाच एका गुंडाने आमचे उमेदवार भुषण शिंगणे यांच्यावर भ्याड हल्ला केला. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, त्यांच्या सोबत असणारे व्यक्ती जखमी झाले. त्यांनी खूप मोठी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. पण या दहशतीला आमचा पक्ष किंवा कार्यकर्ते घाबरणार नाहीत आणि जनता त्यांना आपल्या मतपेटीतून उत्तर देईल. अशा प्रवृत्तीचा कडक बंदोबस्त केला जाईल. लोकशाहीमध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करणे चुकीचे आहे. पण त्यांनी कितीही हल्ले केले तरी लोकशाही जिंकेल."(CM Devendra Fadnavis)
 
भगवा गार्ड हे सिलेक्टिव
 
"भगवा गार्ड ही ठाकरेंनी तयार केलेली ब्रिगेड मालवणी किंवा अनेक भागात दिसत नाही. त्यामुळे हे सिलेक्टिव आहे असे दिसते. परंतू, कुठलीही दहशत खपवून घेतली जाणार नाही," असेही मुख्यमंत्री म्हणाले.(CM Devendra Fadnavis)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) पुढे म्हणाले की, "त्याचे नाव पॅड युनिट आहे. पण ते पाडू केले. याबद्दल निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनीही स्पष्ट केले आहे. ही निवडणूक अचानक आणलेली नाही. सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींना बोलवून त्यांच्यासमोर या मशीनबद्दल सांगितले, असे मला निवडणूक आयोगाने आणि मुंबई महापालिकेनेही सांगितले. ही मशीन सरसकट वापरली जाणार नसून मतमोजणीवेळी एखादी मशीन बंद पडल्यास सोबत यातही डेटा असेल. या मशीनचा डेटा वापरला जात नाही. फक्त मतमोजणीवेळी एखादी मशीन बंद पडली तरच यातील डेटा वापरला जातो."(CM Devendra Fadnavis)
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....