BMC Elections : सुरक्षित मुंबईसाठी आम्हाला शक्ती आणि आशीर्वाद द्यावेत - आमदार अमीत साटम

अमीत साटम यांनी मतदान दिवशी घेतले सिद्धिविनायकचे दर्शन : मान्यवरांनी बजावला मतदानाचा हक्क

    15-Jan-2026
Total Views |
BMC Elections
 
मुंबई : (BMC Elections) मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम  म्हणाले की," विकसित आणि सुरक्षित मुंबई निर्माण करण्याकरता आम्हाला शक्ती आणि आशीर्वाद द्यावेत.तसेच हा मतदानाचा दिवस उद्याचे मुंबईचे भविष्य , इथल्या भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्याकरिता ऐतिहासिक ठरो अशी प्रार्थना देवाकडे केली आहे."(BMC Elections)
 
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी मुंबई महापालिकेच्या (BMC Elections) मतदान दिवशी गुरुवार दि.१५ रोजी सकाळी श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिर कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांसह सरचिटणीस राजेश शिरवडकर उपस्थित होते.(BMC Elections)
 
पुढे ते म्हणाले की,"विकसित मुंबई, सुरक्षित मुंबईसाठी भ्रष्टाचारमुक्त महापालिका (BMC Elections) कारभारासाठी मुंबईकरांनी महायुतीला आणि भाजपाला आशीर्वाद द्यावेत.मुंबई महापालिका (BMC Elections) स्वतःच्या कुटुंबाची जहागीर समजणाऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. त्यामुळे त्यांची ही धडपड दिसत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. वरळीतील बिडीडी चाळीतल्या १६० फुटाच्या घरात राहणाऱ्या मराठी माणसाला, त्याच ठिकाणी ५६० फुटाचे घर देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. कोविड काळात मंदिर बंद करणारे आज स्वतःच्या अस्तित्वासाठी देवाकडे साकडे घालताना दिसत आहेत. किमान या निमित्ताने त्यांना हिंदुत्व आणि हिंदू देवता आठवले आहेत हे बरे झाले आहे.मुंबादेवीचे दर्शन घेण्याचा अधिकार सर्व भक्तांना आहे. पराभव समोर दिसत असल्यामुळे आता निवडणूक प्रक्रियेवर आरोप केले जात आहेत."(BMC Elections)
 
हेही वाचा : मतदानाला जाण्यापूर्वी हे वाचा : महानगरपालिका निवडणुकीत मतदान पद्धतीत मोठा बदल  
 
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की," पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकाना सामोरे गेलो होतो त्यामुळे आम्हाला खात्री आहे की २९ महापालिकेत (BMC Elections) महायुतीचाच महापौर होईल. शत प्रतिशत मतदान व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत."(BMC Elections)
 
मुंबई महापालिका निवडणूकीसाठी (BMC Elections) मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मंत्री आशिष शेलार,आमदार अतुल भातखळकर,आमदार विद्याताई ठाकूर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार चित्रा वाघ,आमदार संजय उपाध्याय, आमदार मिहीर कोटेचा, आमदार पराग शाह , आमदार पराग आळवणी,माजी खासदार गोपाळ शेट्टी,यांसह अभिनेता अक्षय कुमार ,सचिन तेंडुलकर,नाना पाटेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मतदान दिवशी लुंगी नेसली होती.गुडघ्याच्या व्याधीमुळे त्यांनी गेले काही दिवस लुंगी नेसून प्रचार सभेत सहभाग नोंदवला होता त्याला विरोधकांनी राजकीय संबंध जोडून त्यांच्यावर टीका केली होती तेव्हा चव्हाण यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले होते.(BMC Elections)