Keshav Upadhye : अग्रलेख लिहून संजय राऊत उद्धव ठाकरेंचीच अडचण का करत आहेत? केशव उपाध्ये यांचा सवाल

    14-Jan-2026   
Total Views |
Keshav Upadhye
 
मुंबई : (Keshav Upadhye) अग्रलेख लिहून संजय राऊत उद्धव ठाकरेंचीच अडचण का करत आहेत? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केला आहे. सामना वृत्तपत्रात छापून आलेल्या अग्रलेखावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.(Keshav Upadhye)
 
केशव उपाध्ये (Keshav Upadhye) म्हणाले की, "वडापाव नक्कीच जिंदाबाद होता, पण तो कधीच मातोश्रीवर पोहोचला नाही. तिथे गोरगरीबांचा वडापाव नव्हे, तर परदेशी थाटाचा बर्गरच मानाचा पाहुणा होता. विठ्ठलाच्या पंढरीत ज्यांचा जीव गुदमरतो, त्यांनी सामान्य माणसाच्या वडापावावर संस्कृतीचे लेक्चर देऊ नये. वडापाव हा फक्त शिवसैनिकांसाठीच वापरला गेला. सत्तेसाठी, फोटोसाठी आणि दिखाव्यासाठी."(Keshav Upadhye)
 
हेही वाचा : Thackeray brothers: निवडणूकीआधीच ठाकरे बंधूंचा नवा नरेटिव्ह 
 
उद्धव ठाकरे लोकशाहीतून वर आले की, घराणेशाहीतून?
 
"आज जय शाह यांच्याकडे राजपुत्र म्हणून बोट दाखवले जाते, त्यांचे क्षेत्र तरी वेगळे आहे. पण मग उद्धव ठाकरे काय होते? लोकशाहीतून वर आलेले की, घराणेशाहीतून? महाबळेश्वरच्या अधिवेशनात अचानक उद्धव ठाकरे पुढे कसे ढकलले गेले, हे राज ठाकरेंपासून अनेक ज्येष्ठ नेत्यांनी खुलेआम सांगितले आहे. पण सत्य पचवायची तयारी कोणाचीच नाही," अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी केली.(Keshav Upadhye)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....