BMC Elections : राऊतांच्या तोंडी राजकीय अराजकता आणि गुंडशाहीला प्रोत्साहन देणारी भाषा

भाजपा प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांचा घणाघात: नवनाथ बन यांनीही घेतला समाचार

    14-Jan-2026
Total Views |
BMC Elections
 
मुंबई : (BMC Elections) "महानगरपालिका निवडणूकीत (BMC Elections) उबाठा गटाचा पराभव अटळ आहे.हे लक्षात येताच संजय राऊत यांनी मतदानाच्या (BMC Elections) दिवशी दिसेल त्याला ठोका अशी भाषा वापरली.ही भाषा लोकशाहीची नसून राजकिय अराजकता आणि गुंडशाहीला प्रोत्साहन देणारी आहे." असा घणाघात भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यानी केला. (BMC Elections)
 
"लोकशाही ही मतदान (BMC Elections) प्रक्रियेतून चालते दंडुक्याने नाही हे संजय राऊत यांनी लक्षात घ्यावे.पैसा कुठून आला,कसा आला असे आरोप करत राहण्यापेक्षा संजय राऊत यांनी एक तरी ठोस पुरावा लोकांसमोर मांडावा किंवा सक्षम यंत्रणेकडे तक्रार दाखल करावी.वायफळ आरोप आणि कोडयात बोलणे म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे."असा सवाल कुलकर्णी यांनी उपस्थित केला.(BMC Elections)
 
"निवडणूक आयोगाने एक दिवस दान दिला असे विधान करून संजय राऊत यांनी स्वतंत्र आणि संविधानिक संस्थेचा उघड अपमान केला आहे.पराभव दिसू लागला की संविधानिक संस्थावर आरोप करण्याची ही जुनी सवय आहे.भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार राऊत यांना मुळीच नाही.पत्राचाळ घोटाळा,कोविड काळातील गैरव्यवहार आणि मुंबई महानगरपालिकेत (BMC Elections) वर्षानुवर्षे झालेला भ्रष्टाचार हे महाराष्ट्राने पाहिलेले आहे.महानगरपालिका भ्रष्टाचाराने पोखरून काढण्याचे पाप ज्यांनी केले, त्यानी आज शुचिता शिकवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे निव्वळ दुट्प्पीपणा आहे."अशी घणाघाती टीका राम कुलकर्णी यांनी केली.(BMC Elections)
 
"मुंबई महापालिकेत (BMC Elections) संजय राऊत अन उबाठा यांचा दारुण पराभव होतो आहे म्हणून आता राऊत पश्चिम बंगाल, अफगाणिस्तान,चीन ,पाकिस्तानच्या भाषा करीत आहेत. मुंबई महापालिकेत (BMC Elections) जनतेचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टी सोबत आहेत. त्यामुळे पराभवाची निराशा संजय राऊत यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे." असे प्रतिपादन भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवार दि.१४ रोजी केले.(BMC Elections)
 
हेही वाचा : BJP alliance: अहिल्यानगरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार; भाजप युती उमेदवाराच्या कुटुंबावर चाकूने जीवघेणा हल्ला 
 
"अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला सोडणार नाहीत उलट तुम्हाला सोडून ते इकडे आले आहेत हे संजय राऊत यांनी लक्षात घ्यावे. तुम्ही अडीच वर्षात त्यांना भेटायला साधी वेळ देत नव्हता. सर्वसामान्य शिवसैनिकाला मातोश्रीच्या दारात बोलवून परत पाठवण्याचे पाप तुम्ही केले. चाळीस आमदार तुमच्या नाकाखालून निघून गेले तुम्हाला कळले सुद्धा नाही." असेही बन यांनी उत्तर दिले.(BMC Elections)
 
"बॅनरबाजी कितीही झाली तरी लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश मध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा आणली. तीच योजना महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणली. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचे श्रेय भारतीय जनता पार्टीच आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहता आले पाहिजे यासाठी ही योजना आणली गेली."असेही बन यांनी स्पष्ट केले.(BMC Elections)
 
"माझे संजय राऊत यांनाच म्हणणे आहे की तिळगुळ घ्या आणि रोज सकाळी गोड बोला. विनाकारण खोटे आरोप करत बसू नका तुम्ही गोड बोलला तर महाराष्ट्रात शांतता नांदेल. सरकारच्या चांगल्या कामाबद्दल त्यांनी योग्य ते बोलावे. मी त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. राज्यातील सर्व नागरिकांना सुद्धा मी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो." असेही बन म्हणाले.
 
" संजय राऊत यांनी पैशाचा आरोप करणे हे पूर्णतः खोटे आहे. याउलट उबाठाकडून मुंबईत पैशाचा महापूर केला जातोय. उबाठाने एका एका उमेदवाराला २५ कोटी दिल्याची आमची माहिती आहे. कोविड काळात जी रोज १०० कोटींची वसुली केली होती त्यातील पैसे आता उमेदवारांना दिले जात आहेत." असे आरोपास प्रत्युत्तर बन यांनी दिले.(BMC Elections)
 
"मुंबादेवी मुंबईचा विकास करणाऱ्यांनाच आणि मुंबईमध्ये ज्यांनी मेट्रो सुरू केली,कोस्टल रोड सुरू केला,मुंबईकरांचा प्रवास सुखकर केला त्यांनाच आशीर्वाद देईल. ज्यांनी या सर्व कामात खोडा घातला त्यांना मुंबादेवीचा आशीर्वाद मिळणार नाही. आता फक्त नौटंकी करण्यासाठी मुंबादेवीच्या चरणी त्यांना जाव लागतं. पण मुंबादेवीला माहित आहे. मुंबईकरांचा खरा भक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत कारण त्यांनी मुंबईचा चेहरा मोहरा विकासाद्वारे बदलला." असेही बन यांनी स्पष्ट केले.(BMC Elections)