उबाठाच्या मुस्लिम उमेदवाराकडून 'जय श्रीराम' गाण्याची विटंबना! 'व्होट बँके'साठी हिंदुत्व दावणीला?

    14-Jan-2026   
Total Views |

(UBT Candidate Sana Haji Halim Khan Controversy

मुंबई : (UBT Candidate Sana Haji Halim Khan Controversy) मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मुंबईच्या वांद्रे पूर्व प्रभाग क्रमांक ९६ मध्ये सना हाजी हलीम खान या मुस्लिम महिलेला नगरसेवक पदासाठी उमेदवारी दिली. सना खान यांनी निवडणूक प्रचारासाठी ‘जय श्रीराम’ या लोकप्रिय हिंदू गाण्यातील मूळ शब्दांमध्ये बदल केला असल्याचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. सना खान यांनी हिंदूंच्या धार्मिक गाण्यामध्ये स्वतःचे नाव घालून प्रचारासाठी वापरल्याने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह इतर हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला.(UBT Candidate Sana Haji Halim Khan Controversy)
 
समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बेहरामपाडा परिसरात प्रचारादरम्यान उबाठा कार्यकर्ते आणि सना खान यांचे समर्थक एका गाण्यावर घोषणा देताना दिसत आहेत. या गाण्याचे बोल आणि चाल ही ‘जय श्रीराम’ या गाण्याशी साधर्म्य साधणारी असल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या गाण्याचे शब्द थेट उमेदवाराच्या प्रचारासाठी वापरण्यात आले असून त्यामध्ये, “हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा…उबाठा जिंदाबाद…पाडा बेहराम का बच्चा, सना हाजी हलीम खान बोलेगा” अशा घोषणा ऐकू येत आहेत. हिंदुत्वाचा वारसा सांगणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराने हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामांवर रचलेल्या एका लोकप्रिय गीताची अशी विटंबना केल्यामुळे हिंदू समाजात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.. या प्रकरणावर अद्याप उबाठाने कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही.(UBT Candidate Sana Haji Halim Khan Controversy)

 
'व्होट बँके'साठी हिंदुत्व दावणीला?

मुस्लिम मतपेढीला खुश करण्यासाठी आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी एका धार्मिक गाण्यातील हिंदू अस्मितेशी संबंधित शब्द बदलणे, हे उबाठाच्या बदललेल्या विचारधारेचे लक्षण असल्याची टीका समाज माध्यमांवर होत आहे. या व्हिडिओनंतर काही नेटकऱ्यांनी "बाळासाहेबांची शिवसेना अशी नव्हती" अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.


उबाठा कट्टरतावादी खान प्रवृत्तींना महापौर करू पाहतंय का?

'कलमाचे पठण करणारी मुस्लिम महिला मुंबईची महापौर व्हावी' किंवा 'हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान व्हावी' अशी विधाने करणाऱ्या एमआयएमच्या नेत्यांची ही स्वप्ने पूर्ण करण्याचा ध्यास जणू महाविकास आघाडीतील उबाठानेच घेतलेला दिसतो. प्रचारादरम्यान बुरखा परिधान करुन फिरणाऱ्या उबाठा उमेदवार सना खान हिचा साधा चेहराही दिसत नाही. त्यामुळे चेहरा आणि ओळख दोन्ही नसलेल्या उमेदवाराला मतदारांनी कसे लक्षात ठेवायचे? आणि का? खरंच उबाठा अशा कट्टरतावादी खान प्रवृत्तींना महापौर पदावर बसवू पाहतंय का? असा प्रश्न मुंबईकर मतदारांना पडला आहे.(UBT Candidate Sana Haji Halim Khan Controversy)

 
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना केली. परंतु आज मात्र, त्यांच्या पुढील पिढीकडून तुष्टीकरणाचे राजकारण सुरु आहे. त्याच तुष्टीकरणातून मुस्लिम लांगूलचालन सुरु आहे. निवडणुकीसाठी हिंदुत्वाच्या विचारधारेवर पाणी सोडले असतानाच या जिहादी प्रवृत्तींनी आता जय श्रीराम सारख्या धार्मिक गाण्यालाही दूषित करण्याचा आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आहे. या देशविरोधी आणि धर्मविरोधी कृत्याचा विश्व हिंदू परिषद तीव्र निषेध करते.

- श्रीराज नायर, राष्ट्रीय प्रवक्ते, विश्व हिंदू परिषद



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\