मुंबई : (Local Body Elections) राज्यात एकीकडे महानगरपालिका निवडणूकांची धामधूम सुरु असतानाच आता जिल्हा परिषद निवडणूकांचेही (Local Body Elections) बिगुल वाजले आहे. राज्यभरातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान (Local Body Elections) होणार असून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली.(Local Body Elections)
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, त्यात निवडणूका (Local Body Elections) होत आहेत. यानुसार, एकूण १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीतींसाठी निवडणूक (Local Body Elections)होणार आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर विभागातील संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर या जिल्हा परिषदांमध्ये निवडणूका होत आहेत."(Local Body Elections)
या निवडणुकीत (Local Body Elections) प्रत्येक मतदाराला दोन मते देणे आवश्यक आहे. एक मत जिल्हा परिषद आणि दुसरे मत पंचायत समितीसाठी द्यायचे आहे. यासाठी नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाईन असणार आहे. ज्या जागा राखीव आहेत, त्याठिकाणी जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक आहे. या निवडणुकीमध्ये २५ हजार ४८२ मतदान केंद्र असून ही निवडणूक ईव्हीएमद्वारे होणार आहे. मतदान केंद्रात वीज, पिण्याचे पाणी, शौचालय असेल, असेही त्यांनी सांगितले.(Local Body Elections)
कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा?
१२ जिल्हापरिषदांमध्ये एकूण ७३१ जिल्हा परिषद सदस्य निवडून (Local Body Elections) द्यायचे आहेत. यामध्ये महिलांसाठी ३६९, अनुसूचित जाती ८३, अनुसूचित जमाती २५ आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १९१ जागा आहेत. तसेच १२५ पंचायत समित्यांमध्ये एकूण १ हजार ४६२ जागा निवडून द्यायच्या आहेत. यात महिलांसाठी ७३१, अनुसूचित जाती १६६, अनुसूचित जमाती ३८ आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३४२ जागा आहेत.(Local Body Elections)
असा असेल निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन पत्र स्विकारणे - १६ ते २१ जानेवारी २०२६
नामनिर्देशन पत्राची छाननी - २२ जानेवारी २०२६
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत - २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्ह वाटप - २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३.३० नंतर)
मतदानाची तारीख - ५ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....