Mahayuti Election Campaign : ठाण्यात महायुतीच्या विजयासाठी 'निरहुआ' चा संगीतमय प्रचार

भोजपुरी स्टार दिनेशलाल यादव (निरहुआ) व अभिनेत्री आम्रपाली दुबे यांची मतदारांना साद

    13-Jan-2026
Total Views |
Mahayuti Election Campaign

ठाणे : (Mahayuti Election Campaign) ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप - शिवसेना - रिपाई महायुतीच्या (Mahayuti Election Campaign) उमेदवारांच्या प्रचारासाठी सोमवारी प्रसिद्ध भोजपुरी स्टार अभिनेता व खासदार दिनेशलाल यादव उर्फ निरहुआ आणि प्रसिद्ध अभिनेत्री आम्रपाली दुबे ठाण्यात आले होते. या दोन्ही कलाकारांनी ठाण्यातील विविध भागांना भेटी देऊन महायुतीच्या (Mahayuti Election Campaign) उमेदवारांचा संगीतमय प्रचार केला. निरहुआ याने तर देशभक्ती जागावत भोजपुरी गीतातून 'कमळ' आणि 'धनुष्य बाण' या चिन्हाला मत देण्याचे आवाहन करीत धमाल उडवून दिली. यावेळी मोठया संख्येने उपस्थित जनसमुदायानेही "भारत माता की जय" च्या घोषणा देत निरहुआला साथ दिली.(Mahayuti Election Campaign)
 
ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार (Mahayuti Election Campaign)  शिगेला पोहचला असुन प्रचाराचे नवनवे फंडे राजकिय पक्ष तसेच उमेदवार अजमावत आहेत. सोमवारी तर ठाण्यात भोजपुरी स्टार निरहुआ आणि अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनी संगीतमय प्रचाराची धुम उडवुन दिल्याने सर्वत्र "ठाणे" शहर चर्चेत आहे. भोजपुरी अभिनेता व मा खासदार दिनेशलाल यादव (निरहुआ) व अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनी वागळे इस्टेट प्रभाग क्र. १५ मधील इंदिरा नगर नाका, कळवा प्रभाग क्रं. २५ आतकोनेश्वर नगर, मफतलाल मैदान आणि प्रभाग क्रमांक ४ मधील गांधीनगर, नळपाडा, खेवरा सर्कल परिसरात भाजप महायुतीचा (Mahayuti Election Campaign) साग्रसंगीत प्रचार केला.(Mahayuti Election Campaign)
 
हेही वाचा : Thackeray Brothers : पोकळ भाषणे करून ठाणेकरांना विकास मिळेल का? 
 
निरहुआ याने अनेक भोजपुरी गीतांचा नजराणा पेश करून मतदारांशी संवाद साधला. उपस्थितांनीही, भारतमाता की जय च्या जयघोषात फेर धरला होता. यावेळी प्रभाग क्रं १५ मधील भाजप महायुतीचे (Mahayuti Election Campaign) उमेदवार सुरेश चंदू कांबळे, अनिता दयाशंकर यादव, अमित सरैया, प्रभाग क्रमांक ४ मधील भाजपच्या स्नेहा आंब्रे, मुकेश मोकाशी, सेनेच्या आशादेवी सिंह, सिद्धार्थ संजय पांडे तर प्रभाग क्रमांक २५ ड चे उमेदवार ॲड. दिनानाथ पांडे आदी महायुतीच्या उमेदवारांच्या पारडयात भरभरून मतांचे दान टाकण्याचे आवाहन निरहुआ यांनी केले.(Mahayuti Election Campaign)