Vasai Fort : वसई किल्ल्यावर सात संस्थांची संयुक्त संवर्धन मोहीम

    13-Jan-2026
Total Views |
Vasai Fort
 
मुंबई : (Vasai Fort) पेशवे नरवीर चिमाजी आप्पा यांच्या पराक्रमामुळे मराठा साम्राज्यात अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळालेल्या वसई किल्ल्यावर (Vasai Fort) रविवारी संयुक्त संवर्धन मोहीम राबविण्यात आली. मुंबईच्या जवळ असलेला हा भुईकोट किल्ला सुमारे ११० एकर परिसरात पसरलेला असून दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देत असतात.(Vasai Fort)
 
वसई किल्ल्यात (Vasai Fort) ११ बुरुज, सुमारे ४.५ किलोमीटर लांबीची भक्कम तटबंदी तसेच विविध देवतांची प्राचीन मंदिरे आजही अस्तित्वात आहेत. या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने दर्या दरवाजा, लक्ष्मण बुरुज आणि राम बुरुज या मोक्याच्या ठिकाणी संवर्धन कार्य यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले.(Vasai Fort)
 
हेही वाचा : Thackeray Brothers : पोकळ भाषणे करून ठाणेकरांना विकास मिळेल का? 
 
या संयुक्त संवर्धन मोहिमेत हिंदू धर्मरक्षक सामाजिक संस्था, समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था, मावळे आम्ही स्वराज्याचे, शिव शौर्य प्रतिष्ठान, मावळवाट सफर, स्वराज्यरक्षक संभाजी राजे प्रतिष्ठान आणि स्वराज्य सेवक प्रतिष्ठान या सात संस्थांचा सहभाग होता. महाराष्ट्राच्या विविध भागांतून सुमारे १५० दुर्गसेवक व दुर्गसेविका या मोहिमेसाठी उपस्थित होते.(Vasai Fort)
 
ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी अशा संयुक्त संस्थात्मक मोहिमा महत्त्वाच्या असल्याचे नमूद करत भविष्यात राज्यातील इतर गडकिल्ल्यांवरही अशा संवर्धन मोहिमा राबविण्याची गरज असल्याची माहिती आयोजन समितीच्या वतीने प्रथमेश सोलकर यांनी दिली.(Vasai Fort)