Gyanakulam Child Development Association : ज्ञानकुलचा उत्थानोत्सव प्रदर्शन सोहळा संपन्न; भारतीय संस्कृती व सामाजिक मूल्यांचे सादरीकरण
12-Jan-2026
Total Views |
मुंबई : (Gyanakulam Child Development Association) चेंबूर येथील संवर्धन ज्ञानकुलम बालविकास संघाच्या (Gyanakulam Child Development Association) वतीने “ज्ञानकुलचा उत्थानोत्सव प्रदर्शन सोहळा” हा तीन दिवसीय उपक्रम ९ ते ११ जानेवारीदरम्यान पार पडला. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती, सामाजिक मूल्ये आणि नागरिक कर्तव्ये यांचे विविध माध्यमांतून सादरीकरण केले.(Gyanakulam Child Development Association)
या प्रदर्शनात स्वदेशी विचार, पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता आणि नागरिक कर्तव्य या पाच प्रमुख विषयांवर आधारित त्रिमिती प्रतिकृती सादर करण्यात आल्या. तसेच चित्रे, तक्ते आणि कोड्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या सामाजिक जबाबदाऱ्यांचे सादरीकरण केले.(Gyanakulam Child Development Association)
प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध संवादक, लेखक व कवी मनोज मुंतशिर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचारक सुमंत आमशेकर तसेच उद्योजक संजय हावरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. दुसऱ्या दिवशी भाभा अणुसंशोधन केंद्राचे वैज्ञानिक कृष्ण गुप्ता आणि प्रगती प्रतिष्ठानचे वीरेंद्र चंपानेरकर (जव्हार) यांनी प्रदर्शनास भेट दिली. तिसऱ्या दिवशी एअर मार्शल धनंजय वाणी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कुटुंब प्रबोधन प्रमुख रवींद्र जोशी उपस्थित होते.(Gyanakulam Child Development Association)
या मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेतील विद्यार्थ्यांनी सलग तीन दिवस सकाळी अकरा ते एक या वेळेत रामभजन, देशभक्तीपर गीते आणि शिवकालीन शस्त्रविद्येचे सादरीकरण केले.(Gyanakulam Child Development Association)
या प्रदर्शन सोहळ्यास चेंबूर परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भेट दिली. तीन दिवसांच्या या उपक्रमात दीड हजारांहून अधिक नागरिकांनी प्रदर्शन पाहिले. या कालावधीत उपस्थित नागरिकांनी लिखित स्वरूपात संकल्प नोंदवले, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.(Gyanakulam Child Development Association)
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुढील तीन ते चार महिन्यांत ज्ञानकुलमचे विद्यार्थी समाजामध्ये जाऊन शंभर विविध कार्यक्रम राबविणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.(Gyanakulam Child Development Association)
या उत्थानोत्सव प्रदर्शन सोहळ्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, कौटुंबिक मूल्ये, पर्यावरणाबाबत जागरूकता, सामाजिक समन्वय आणि नागरिक कर्तव्ये यांचा प्रसार करण्यात आला.(Gyanakulam Child Development Association)