मुंबई : (Nitesh Rane) बाळासाहेबांमुळे दंगलीत मुंबईतला हिंदू वाचला. पण उबाठा मुख्यमंत्री असताना कोरोनात हिंदूची मंदिरे बंद केली, आपल्या देवी देवतांच्या मूर्ती छोट्या करायला सांगितल्या. मिरवणूका लवकर बंद करायला लावल्या पण ईद आणि मोहरमला मात्र रात्रभर धिंगाणा चालू होता. हे पाहायला बाळासाहेब असते तर पोराला कंबरेत लाथ घालून मातोश्री बाहेर हाकलले असते, असे मत राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. ते वरळी येथील बीडीडी चाळीत प्रभाग क्र. १९५ चे महायुतीचे उमेदवार राजेश कांगणे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. (Nitesh Rane)
ते म्हणाले की, मी वरळीत आलो हे समजल्यावर अनेकांना वाटले ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात राणे आले, पण बालेकिल्ला त्याचाच असतो जो साठ सत्तर हजार मतांनी निवडून येतो. पाच सहा हजारांच्या काठावर निवडून येणाऱ्यांचा बालेकिल्ला नसतो. इथला स्थानिक प्रतिनिधी एकावेळी राज्याचा कॅबिनेट मंत्री होता. त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, परंतु तरीही या लोकांनी बीडीडीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी तसेच एकनाथ शिंदे यांनी तत्परतेने हा प्रश्न सोडवायला सुरुवात केली. (Nitesh Rane)
ते पुढे म्हणाले की, दोन भाऊ एकत्र आले म्हणून राज्यभर चर्चा झाली, परंतु ते एकत्र सर्वसामान्यांच्या मुलामुलींना नोकरी मिळावी, त्यांचे भविष्य घडावे यासाठी आलेले नाहीत. तर आदित्य आणि अमित बेरोजगार होऊ नयेत यासाठी एकत्र आलेत, अशी टीका त्यांनी केली. (Nitesh Rane)
यावेळी दक्षिण मुंबई जिल्हा महायुती समन्वयक किरण शेलार, संतोष धुरी तसेच महायुतीचे उमेदवार राजेश कांगणे उपस्थित होते. (Nitesh Rane)
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.