धारावी पुनर्विकासाला विरोध हा काँग्रेस आणि ठाकरेंच्या अंगलट येईल; मंत्री आशिष शेलारांचे सूचक विधान

‘धारावी’ हे जगातलं सर्वात मोठं पुनर्विकासाचं उदाहरण ठरेल...

Total Views |
Ashish Shelar
 
मुंबई : ( Ashish Shelar ) "उद्धवजी आणि काँग्रेसने धारावीच्या पुनर्विकासाला केलेला विरोध आणि ते पसरवू पाहणारे नॅरेटिव्ह उद्धवजींच्या आणि काँग्रेसच्या अंगलट येईल", असे विधान मंत्री आशिष शेलार यांनी एका मुलाखतीदरम्यान केले. धारावीकरांना पुनर्विकासापासून वंचित ठेवण्याचे काम ही लोक करत आहेत असेही ते यावेळी म्हणाले.
 
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक जाहीर झाल्यापासूनच मुंबईत आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. अशावेळी धारावी पुनर्विकासाचा मुद्दाही तितकाच चर्चेचा विषय ठरतो आहे. याविषयी ठाकरे आणि काँग्रेसच्या धारावी प्रकल्प विरोधाला उत्तर देताना मंत्री आशिष शेलार म्हणाले,"एकीकडे धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला मुंबईत परवडणारी घर मिळणार नाही अशी बोंब मारायची. मुंबईतला मुंबईकर आणि मराठी माणूस बाहेर चाललाय अशी बोंब मारायची आणि पुनर्विकासाच्या प्रकल्पाला विरोध करायचा हे काय नागरिकांना कळते आहे.
 
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावर वाद: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा आक्षेप, नेमकं प्रकरण काय?
 
पुढे ते म्हणाले, "धारावीत राहणारा मुंबईकर मराठी माणूस त्याला पुनर्विकासात धारावीतच आणि मुंबईतच घर मिळणार आहे. धारावी भारतातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असा परिचय जगभरात काँग्रेसमुळे झाला. ती झोपडपट्टी आता जगातला पुनर्विकासच अर्बन रीडडेव्हलपमेंटचं मोठं उदाहरण ठरेल. यात मोकळी जागा, मल्टी कम्युनिकेशन ट्रान्सपोर्ट आणि शाळा निर्माण होतील. उद्यान निर्माण होतील. रस्ते निर्माण होतील. घर निर्माण होतील. अनिवासी गाळे निर्माण होतील. या सगळ्यांने इकॉनॉमी वाढेल.
 
धारावीला विरोध करणं म्हणजे झोपडपट्टी राहणाऱ्या माणसाला विरोध करणं, धारावी पुनर्विकासाला विरोध करणार म्हणजे मराठी माणसाच्या पुनर्विकासाच्या धोरणाला विरोध करणं, धारावी पुनर्विकासाला विरोध करणं म्हणजे मुंबईकरांना मुंबईतच परवडणारी घर मिळणार या गोष्टीला विरोध करणं, धारावीला विरोध करणं म्हणजे आपल्या मुंबईतल्या रोजगार व्यवस्थेत होणाऱ्या बदलाला विरोध करणं, धारावीच्या पुनर्विकासाला विरोध करणं म्हणजे मोकळ्या जागांच्या निर्मितीला विरोध करणे हे काँग्रेस आणि ठाकरेंच्या अंगलट येणार", असा इशाराच आशिष शेलार यांनी यावेळी दिला आहे.
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.