Adv. Ujala Yadav: ॲड. उजाला यादव यांचा भाजपामध्ये प्रवेश
11-Jan-2026
Total Views |
मुंबई : (Adv. Ujala Yadav) मुंबई उच्च न्यायालयातील नामवंत कायदेतज्ज्ञ अॅड. उजाला यादव यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शनिवार दि.१० रोजी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी त्यांचे स्वागत केले. (Adv. Ujala Yadav)
"त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपच्या कायदेशीर तसेच सामाजिक आघाडीला मोठी बळकटी मिळाली आहे. कायदा, न्याय आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी आणि पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोलाचा ठरणार आहे."असे प्रतिपादन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी यावेळी केले. (Adv. Ujala Yadav)
यावेळी आमदार अमीत साटम,जिल्हाध्यक्षा शलाका साळवी, जिल्हाध्यक्ष नीरज उभारे तसेच पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Adv. Ujala Yadav)